घरलाईफस्टाईलतोंडाला चव जाणवत नाही? ही असू शकतात कारणे

तोंडाला चव जाणवत नाही? ही असू शकतात कारणे

Subscribe

काही वेळेस आजारपणात तोंडाची चव जाते. पण त्याव्यतिरिक्त इतरवेळेसही काही जाणांच्या जीभेची चव जाते. यामुळे सारेच बेचव वाटते. अनेकांची यासोबतच वास घेण्याची क्षमताही कमी होते. मग यामागे नेमके कारण काय हे जाणून घ्या आणि त्यानुसार उपचार सुरू करा.

मधूमेह – टाईप 2 मधूमेहाचे एक लक्षण म्हणजे चव न समजणे. प्रामुख्याने वयाची पन्नाशी पार केलेल्यांमध्ये हा त्रास जाणवतो.

डोक्याची दुखापत – एखाद्या अपघातामध्ये डोक्याला जबर धक्का बसल्यास चेतासंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा चव कळत नाही. यामुळे चवीसोबत वास घेण्याची क्षमताही कमजोर होते. डोक्याला लागलेला मार तीव्र स्वरूपाचा असल्यास हा त्रास कायमस्वरूपीचा ठरू शकतो.

- Advertisement -

अप्पर रेस्परेटरी इंफेक्शन – ताप किंवा खोकल्याच्या त्रासामध्ये अनेकांना चव जाणवत नाही. अप्पर रेस्परेटरी इंफेक्शनमध्ये चव कमी होते. सायनस, ब्रोन्कायटीसच्या त्रासामध्ये हा त्रास अधिक जाणवतो. जसजसे इंफेक्शन कमी होते तसा हा त्रास कमी होतो.

व्हिटॅमिन बी ची कमतरता-  व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता वेळीच लक्षात न आल्यास चवीसोबतच वास घेण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे तुम्हालाही हा त्रास जाणवत असल्यास रक्ताची चाचणी करा. त्यामधून व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचे निदान करता येते.वाढत्या वयानुसार, चव कमी होण्याचा त्रास काहींना जाणवू शकतो. जन्माला येताना सुमारे १०,००० टेस्ट बर्ड असतात. परंतु वाढत्या वयानुसार हे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे वाढत्या वयानुसार सुद्धा जिभेची चव कमी होत जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -