घरमनोरंजनशीतल आणि अजिंक्य आसाममध्ये साजरा करणार गणेशोत्सव

शीतल आणि अजिंक्य आसाममध्ये साजरा करणार गणेशोत्सव

Subscribe

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणार्‍या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे.

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणार्‍या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे. सध्या मालिकेत अजिंक्यच पोस्टिंग आसामला झालंय आणि तिथे तो मन लावून त्याचं काम करतोय. शीतली पण आसामला त्याला भेटायला गेली असून तिथल्या सगळ्या लोकांमध्ये मिसळतेय.

गणेश चतुर्थीचा सण अगदी जवळ आला आहे, पण शीतल आणि अजिंक्य यंदा या उत्सवासाठी घरी नाहीत. तरीही हा सण साजरा करण्यात ते दोघेही कुठलीही कमी पडू देणार नाहीयेत. शीतलअजिंक्यला आसाममध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे सुचवते हे प्रेक्षक मालिकेच्या आगामी भागात पाहता येईल.अजिंक्य आणि त्याच्या सहकार्‍यांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शीतल आणि अजिंक्य प्रयत्न करताना दिसणार आहेत. शीतलला उत्सव साजरा करण्याची संधी मिळेल का? शीतल व अजिंक्य तेथील लोकांना आपल्या संस्कृतीचं दर्शन कसं घडवणार? हे पाहणं रंजक ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -