घरट्रेंडिंगGoodNews! 'या' कंपनीने तब्बल १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली एका आठवड्याची भरपगारी...

GoodNews! ‘या’ कंपनीने तब्बल १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली एका आठवड्याची भरपगारी सुट्टी!

Subscribe

जगभरासह देशभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा कहर सुरू असताना बऱ्याच कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अशा तणावपूर्ण वातावरणात देखील खचलेल्या बेरोजगारांना नोकरीच्या संधीच्या उपलब्धतेची माहिती देण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या एका कंपनीने मदतीचा हात पुढे सरसावला. कोरोना सारख्या परिस्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत पाहता त्यांना थोडी विश्रांती मिळावी या हेतूने ‘या’ कंपनीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही दिलदार कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या असणाऱ्या प्रोफेशनल नेटवर्क कंपनी लिंक्डइन (LinkedIn).

मिळालेल्या माहितीनुसार, लिंक्डइनने (LinkedIn) आपल्या सर्व १५ हजार ९०० कर्मचाऱ्यांसाठी एका आठवड्याची पगारी रजा देण्याचे ठरवले आहे. ही सुट्टी सर्व कर्मचाऱ्यांना पुढच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. आपल्यावर आलेल्या कामाच्या ताणतणावापासून थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा काम करण्यास रिचार्ज व्हावं, असा उद्देश ही सुट्टी देण्यामागचे असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

असे देखील कंपनीकडून सांगितले जात आहे की, सातत्याने केलेल्या कामामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण येतो. त्यापासून वाचण्यासाठी आणि काही काळ निवांत घालवण्यासाठी कंपनीने आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची फुलपगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनामुळे कंपनीचे कर्मचारी गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम करत असून या कंपनीच्या १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना जरी आठवड्याभराची सुट्टी दिली असली तरी यादरम्यान लिंक्डइनच्या कोअर टीमचे सदस्य काम करत राहणार आहेत. तर हे सदस्य नंतर आपल्या वेळेप्रमाणे रजा घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -