घरमहाराष्ट्रगृहमंत्री अनिल देशमुख पायउतार

गृहमंत्री अनिल देशमुख पायउतार

Subscribe

सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर राजीनाम्याचा निर्णय, वसुलीचा आरोप भोवला. महिनाभरात आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. देशमुख यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडी सरकारला महिनाभरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गृह खात्याची जबाबदारी दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे सोपण्यात आली आहे. तर वळसे – पाटील यांच्याकडील राज्य उत्पादन शुल्क आणि कामगार खाते अनुक्रमे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतून महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. २० मार्चच्या या पत्राने मोठा गदारोळ उडाला होता. याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णयही घेतला होता.

यासंदर्भात ऍड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करावी, असे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री


Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -