घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या हाती राज्य की त्यांच्यावर राज्य आलंय!

उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य की त्यांच्यावर राज्य आलंय!

Subscribe

राज ठाकरेंचा टोला

महाविकास आघाडी सरकारने दोन महिन्यात दुसर्‍या मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे. मागील सव्वा वर्षांपासून उद्धव ठाकरे सरकारची कामापेक्षा बदनामी जास्त झाली आहे. यावर ‘उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय’,असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्हिसीद्वारे संवाद साधला होता. या संवादात मुख्यमंत्र्यांना आपण काय सूचना केल्या याविषयी मंगळवारी राज यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, ‘सरकारने परराज्यातून परतलेल्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या असत्या तर राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला नसता आणि आज महाराष्ट्रातील जनतेला घरात बसून राहावे लागले नसते.’ एकूणच सरकारची बदनामी तसेच कोरोनाशी दोन हात करताना अपेक्षेप्रमाणे काम न केल्याचा परिणाम असो उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आल्याची भावना राज यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ का आली? यावर राज यांनी प्रकाश टाकला. ‘आता सर्वाधिक महाराष्ट्रात का दिसत आहेत, याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य असून परराज्यातील माणसे महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद होत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण जास्त दिसत आहेत. मुख्य म्हणजे लॉकडाऊन काळात परतलेल्या परराज्यातील नागरिकांची पुन्हा येताना नोंद करावी. त्यांची कोरोना चाचणी करावी, असे मी सुचवले होते, परंतु राज्य सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाही. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना घरात बसावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -