घरताज्या घडामोडीगिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

Subscribe

गिरणी कामगारांच्या संपानंतर मुंबईतील हा श्रमिक वर्ग संपल्यात जमा होता, असे वाटत असताना इस्वलकर यांनी या लढ्यात प्राण फुंकले.

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर मुंबईतील हा श्रमिक वर्ग संपल्यात जमा होता, असे वाटत असताना इस्वलकर यांनी या लढ्यात प्राण फुंकले. गिरणी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले, तसेच त्यांना आणि वारसांना हक्काची मुंबईत घरे मिळवून दिली. जवळपास दहा हजार कामगारांना घरे मिळाल्याने त्यांची वाताहत थांबली. स्वतः गिरणी कामगार असल्याने इस्वलकर यांना कामगारांची दुःख जवळून माहीत होती. त्यांची थकीत वेतने यासह घरांसाठी इस्वलकर यांनी गेले तीन दशके लढा दिला.

गिरणी संपामुळे कोलमडून पडला असताना इस्वलकर आणि त्यांच्या संघर्ष समितीमधील सहकार्‍यांनी कामगारांना उभे करण्याचे मोठे काम केले. यासाठी उपोषणे, आंदोलने आणि मोर्चा या लोकशाही मार्गाचा संयमी वापर करत त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवले. सर्वांना बरोबर घेऊन जात काम करण्याची त्यांची हातोटी वाखणण्याजोगी होती.

- Advertisement -

राज्यकर्त्यांना भेटून अतिशय शांतपणे कामगारांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवणे यात त्यांची हातोटी होती. अतिशय साधी राहणी असलेले इस्वलकर यांनी शेवटपर्यंत कामगारांच्या प्रश्नांचा विचार केला. कामगार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -