घरताज्या घडामोडीममता बॅनर्जींवर २४ तासांची प्रचार बंदी, निवडणूक प्रचार उल्लंघन प्रकरण

ममता बॅनर्जींवर २४ तासांची प्रचार बंदी, निवडणूक प्रचार उल्लंघन प्रकरण

Subscribe

ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवढणूकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार घमाशान सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासा प्रचार बंदी घातली आहे. यामुळे आता ममता बॅनर्जी पुढील २४ तास प्रचार करु शकत नाहीत. निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रचारादरम्यान हिंदू-मुस्लिम वक्तव्यामुळे ही कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे. ममता यांच्यावर १२ एप्रिल रात्री ८ पासून ते १३ एप्रिल रात्री ९ पर्यंत प्रचार करण्यास बंदी असेल.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम मतदात्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर कारवाई केली आहे. तसेच महिलांना सुरक्षा रक्षकांना घेराव घालण्याचे आदेश दिले होते. यानंतर निवडणूक आयोगाने ममतांना २ नोटीस पाठवल्या होत्या, या नोटीसांवर ममता बॅनर्जींनी दिलेलं उत्तर निवडणूक आयोगाला पटले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरु असून पाचव्या टप्प्यातले मतदान प्रक्रिया सुरु आहे. निवडणूकीमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकामेकांवर निशाणा साधत आहेत.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरु आहे. विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये(टीएमसी) जोरदार लढत सुरु आहे. भाजप आणि टीएमसी मध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरी झडली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या टीएमसीचे सरकार आहे. पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पुर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणूकीमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पश्चिम बंगालमध्ये सभा घेत ममतांवर टीका केली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -