घरताज्या घडामोडीऑर्डर ८ नंतर घेतल्यामुळे Zomatoने केली Swiggyची तक्रार, मुंबई पोलिसांनी दिला चांगलाच...

ऑर्डर ८ नंतर घेतल्यामुळे Zomatoने केली Swiggyची तक्रार, मुंबई पोलिसांनी दिला चांगलाच समज

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे बुधवार रात्रीपासून आणखीन कडक निर्बंध लादून संचारबंदी जाहीर करण्यात आली. यादरम्यान ऑनलाईन फूड डिलिव्हरीसह अनेक अत्यावश्यक सेवेतील गोष्टींना सूट देण्यात आली. बुधवारी रात्री ८ वाजल्यामुळे राज्यात संचारबंदीला सुरुवात झाली. यादरम्यान मुंबईत बुधवारी रात्री ८ वाजल्यानंतर ऑर्डर घेतल्यामुळे झोमॅटोच्या सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी प्रतिस्पर्धी स्विगीवर (Swiggy) निशाणा साधला आहे. एवढेच नाहीतर दीपिंदर यांनी मुंबई पोलिसांना ट्वीट टँग करून तक्रार केली आणि स्विगीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

यापूर्वी ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आणि स्विगीमध्ये अशाप्रकारचे वाद पाहायला मिळाले आहेत. तरी झोमॅटो आपल्या ट्वीटनंतर स्वतःची चूक असल्यामुळे माफी मागावी लागली. दरम्यान झोमॅटोचे सीओ दीपिंदर गोयल यांनी स्विगीवर निशाणा साधत एक ट्वीट केलं आहे. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

दीपिंदर गोयलने ट्वीटसोबत स्विगीच्या वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि लिहिले की, ‘झोमॅटो मुंबई रात्री ८ वाजल्यामुळे आवश्यक फूड डिलिव्हरी करण्यासाठी तयार आहे, परंतु आम्ही असे करत नाही कारण आम्ही कायद्याचे पालन करत आहोत. तर मेी बघत आहे की, आमचे प्रतिस्पर्धी रात्री ८ वाजल्यानंतर ऑर्डर घेत आहेत. मुंबई पोलिसांना याचे स्पष्टीकरण द्यावे, असा माझा आग्रह आहे.’

- Advertisement -

त्यानंतर मुंबई पोलिसांना सीईओ दीपिंदर गोयल यांनी उत्तर दिले. ज्यानंतर झोमॅटोला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरू केले. मुंबई पोलिसांनी असे उत्तर दिले की, सरकारकडून दिलेल्या मार्गदर्शन सूचना कृपया नीट वाचा. सरकारने असे सांगितले आहे की, होम डिलिव्हरी सुरू असले, परंतु याच्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही.

मुंबई पोलिसांच्या या ट्वीटनंतर झोमॅझोच्या सीईओंना चूक समजली आणि त्यांनी अजून एक ट्वीट करत मुंबई पोलिसांचे आभार मानले.


हेही वाचा – कोरोनाची परिस्थिती चिंताजनक! Swiggyने घेतला मोठा निर्णय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -