घरक्राइमNCB ची मोठी कारवाई; २० लाखांच्या रोकडसह ४३ किलो गांजा जप्त

NCB ची मोठी कारवाई; २० लाखांच्या रोकडसह ४३ किलो गांजा जप्त

Subscribe

मुंबई-ठाण्यातील अमली पदार्थ तस्करांचा पर्दाफाश करण्तयात आला असून पासादरम्यान लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. अमली पदार्थाविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करतत ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. एनसीबीकडून मुंबई आग्रीपाडा आणि ठाणे जिल्ह्यांतील बदलापूर येथे छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान एनसीबीने २२० ग्रॅम ड्रग्ज, ४३ किलो गांजा आणि २० लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मुंबईतील आग्रीपाडा परिसरात राहणाऱ्या सरफराज कुरेशी उर्फ पप्पी या आरोपीच्या घरी धाड मारुन तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान आरोपीच्या घरातून १६५ ग्रॅम एमडी अमली पदार्थ आणि २ लाखा १५ हजारांची रोकड आढळून आली. याबाबात सरफारराज याची चौकशी केली असता हे अमली पदार्थ नागपाडा येथील राहणाऱ्या समीर सुलेमान शमा तस्कराकडून मिळाले असल्याचे समोर आले आहे. यानंतर सुलेमान शमा या आरोपीच्या घरी मारलेल्या छापादरम्यान ५४ ग्रॅम एमडी आणि १७ लाख ९० हजारांची रोकड आढळून आली. मात्र समीर सुलेमान हा आरोपी फरार असून एनसीबीकडून त्याचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

बदलापूर येथे करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सनी परदेशी आणि अजय नायर याा अमली पदार्थ तस्करांना अटक करुन तब्बल ४३ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. हा गांजा अमली पदार्थ ओडीशामधून तस्करी करुन आणण्यात आला होता.


हे वाचा-  रोजच्या मारहाणीला कंटाळला, अखेर अल्पवयीन मुलाने जन्मदात्यावर चालवली कुऱ्हाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -