घरदेश-विदेशCOVID-19 Pandemic: आज बंगालमध्ये BJP-TMC नेत्यांची प्रचार रॅली; गेल्या २४ तासात १०...

COVID-19 Pandemic: आज बंगालमध्ये BJP-TMC नेत्यांची प्रचार रॅली; गेल्या २४ तासात १० हजार नव्या बाधितांची नोंद

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावादरम्यान एका दिवसात बुधवारी सर्वाधिक बाधितांची नोंद करण्यात आली. यानुसार गेल्या २४ तासात १० हजार ७८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. झपाट्याने होणाऱ्या कोरोनाच्या या संकटादरम्यान, आज बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. इतकेच नाही तर आज बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीच्या सर्व बड्या नेत्यांच्या प्रचार सभा आणि रॅली देखील होणार आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. विधानसभा मतदानाच्या सातव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी आज चार जाहीर सभांना संबोधित करणार आहे. दक्षिण दिनाजपूर, मालदा, पश्चिम वर्धमान जिल्ह्यात सकाळी ११ ते दुपारी ३ या दरम्यान या जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री अमित शहा हरिरामपूर, गजोल आणि दुर्गापूर पूर्व विधानसभा मतदार संघात तीन जाहीर सभा घेणार आहेत. याशिवाय, बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्या ४ प्रचार सभेचे आयोजन करण्यात येणार आहेत. टीएमसी पक्षातून भाजपमध्ये सहभागी झालेले शुवेंदू अधिकारी तीन प्रचार रॅली करणार आहे तर भाजप खासदार मनोज तिवारी हे दोन प्रचार रॅलीसह जाहीर सभा घेणार आहे. भाजपा नेते शाहनवाज हुसेन हे देखील प्रचार रॅलीसह जाहीर सभा घेणार आहेत.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने होत असून बुधवारी सर्वाधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यानुसार गेल्या २४ तासात १० हजारांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा वाढून ६ लाख ९५६ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात ५८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढून १० हजार ७१० इतका झाला आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -