घरताज्या घडामोडीoxygen shortage: राज्यांतील ऑक्सिजन वाहतूक सुळीत करा, गृहमंत्रालयाचा आदेश

oxygen shortage: राज्यांतील ऑक्सिजन वाहतूक सुळीत करा, गृहमंत्रालयाचा आदेश

Subscribe

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीमुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशात राज्यांतर्गत आणि देशांतर्गत राज्यांमधील ऑक्सिजनची वाहतूक सुरळीत करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजनची राज्यांमध्ये आणि राज्यांतर्गत वाहतूक सुरळीत करावी असे निर्देश वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांवर तात्काळ उपचार मिळण्यासाठी ऑक्सिजन वेळेत पोहोचण्यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत.

गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, वैद्यकीय ऑक्सिजन ही सार्वजनिक आरोग्य वस्तू आहे. देशातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा आल्यास त्याचा गंभीर परिणाम कोरोनाबाधित रुग्णांवर होण्याची शक्यता आहे. तसेच वैद्यकीय ऑक्सिजन वाहतूकीवर राज्यात कोणतेही बंधने घालता येणार नाही. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा येणार नाही यासाठी वाहतूक विभागाने मुक्त वाहतुकीची परवानगी द्यावी असे निर्देशही परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. ऑक्सिजन वाहन कोणत्याही जिल्ह्यातून किंवा भागात पुरवठा करण्यासाठी कोणताही अधिकार यास संलग्न करू शकत नाही

- Advertisement -

ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांना आणि उत्पादक यांना राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा मर्यादित ठेवण्यास कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही. त्यात असे नमूद केले आहे की कोणत्याही प्राधिकरण जिल्ह्यात किंवा भागात जाणाऱ्या ऑक्सिजन वाहनांना कोणत्याही विशिष्ट जिल्ह्यात किंवा क्षेत्रास विशिष्ट पुरवठा करण्यासाठी संलग्न करु शकत नाही.

गृहमंत्रालयाने असे आदेश दिले आहेत की, २२ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक कामासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास बंदी असेल परंतु वेद्यकीय ऑक्सिजन पुरवठा वेळेत आणि योजनेचे काटेकोर पालन करावे. या निर्देशांची अंलबजावणी जिल्हादंडाधिकारी, उपायुक्त आणि वरिष्ट पोलीस अधीक्षक करतील तसेच ते यासाठी जबाबदार असतील. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठा करणे महत्त्वाचे आहे. गेल्या २४ तासात ३ लाखहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झआली आहे. देशाची कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -