घरक्रीडाIPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का: आश्विन घेतली स्पर्धेतून माघार

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का: आश्विन घेतली स्पर्धेतून माघार

Subscribe

आयीपीएलच्या (IPL 2021) १४ व्या मोसमात दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आश्विनने ट्विटरवर याची माहिती दिली. आश्विनच्या कुटुंबातील सदस्य कोरोना महामारीचा सामना करत आहेत. त्यामुळे कुटुंबाला आधार देण्यासाठी मी जात आहे, असं आश्विनने काल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर सांगितलं.

आश्विनने सामना संपल्यानंतर ट्विट करत तो स्पर्धेतून माघार घेत असल्याचं सांगितलं. “मी उद्यापासून आयपीएलमधून माघार घेत आहे. माझं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. मला या कठीण काळात त्यांना आधार द्यायचा आहे. जर भविष्यात परिस्थिती सुधारली तर मी परत येईन, अशी आशा आहे,” असं ट्विट आश्विनने केलं आहे.

- Advertisement -

महामारीविरुद्धच्या लढाईत सर्वोतपरी मदत करेन

यापूर्वी अश्विन यांनी २३ एप्रिल रोजी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की कोरोना महामारीविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी जे काही शक्य आहे ते मी करेन, असं म्हटलं होतं. “मी सर्वांना सांगू इच्छितो की हा विषाणू कोणीालाही सोडत नाही आणि या लढ्यात मी तुमच्या सर्वांबरोबर आहे. या लढाईत तुमच्यापैकी कोणालाही माझ्या मदतीची आवश्यकता असल्यास कृपया सांगा. मी माझ्याकडून शक्य तेवढी मदत करेन”, असं ट्विट आश्विनने केलं होतं.

- Advertisement -

दुसर्‍या एका ट्वीटमध्ये त्यांनी या कठीण काळात देशवासीयांना जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे. “माझ्या देशातील याक्षणी परिस्थिती पाहून अस्वस्थ झालो आहे. मी आरोग्यसेवा क्षेत्राशी जोडलेला नाही, परंतु या कठीण वेळी त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मी सर्व देशवासीयांना या परिस्थितीत पूर्ण काळजी घेण्याचं व स्वतःचं संरक्षण करण्याचं आवाहन करतो” असं आश्विनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -