घरमहाराष्ट्रमुंबई आणि कोकण म्हाडाची स्वतंत्र लॉटरी होणार

मुंबई आणि कोकण म्हाडाची स्वतंत्र लॉटरी होणार

Subscribe
सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न साकार करणाèया म्हाडामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात मुंबई आणि कोकण मंडळांच्या सुमारे ५ हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार होती. मात्र मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे मुंबई समोर अनंत अडचणींचा डोंगर उभा राहिल्याने कोकण म्हाडासाठी स्वतंत्र लॉटरीची मागणी होत आहे. त्यामुळे यंदा मे अखेर कोकण म्हाडाची ३३०० घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

मुंबई म्हाडा आणि कोकण म्हाडाच्या वतीने संयुक्तपणे सुमारे ५ हजार घरांची लॉटरी मे महिन्यात काढण्यात येणार असल्याचे  गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी जाहीर केले होते. तसे न होता केवळ कोकण म्हाडाच्या ३३०० घरांची लॉटरी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या वर्षीच्या लॉटरीतील ४० टक्के लाभार्थीनी घरे परत केली आहेत. त्यामुळे कोकण म्हाडाला आपल्या घरांची काळजी वाटू लागली आहे. घरे परत करण्याची अनेक कारणे तरी यावर्षी तसे होऊ नये यासाठी कोकण म्हाडा स्वत:च लॉटरी काढण्याच्या तयारीला लागले आहे. मुंबईबरोबर आपली लॉटरी होऊ नये, अशी विनंती कोकण म्हाडाने केली होती.

तर कोकणाच्या लॉटरीवर परिणाम होईल

म्हाडाच्या लॉटरीसाठी नागरिकांना एक विशिष्ट रक्कम म्हाडाकडे अर्ज करताना भरावी लागते. दोन्ही लॉटरी एकत्र केल्यास सर्वसामान्य नागरिकांची अडचण होते. दोन्ही ठिकाणी इच्छुकांना अनामत रक्कम भरणे शक्य होत नाही. त्यामुळे दोन्ही लॉटरी एकत्र झाल्यास कोकण मंडळांकडे इच्छुकांचे अर्ज कमी प्रमाणात येतात. त्यामुळे कोकणच्या घरांच्या विक्रीवर त्याचा विपरित परिणाम होतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -