घरताज्या घडामोडीहोम आयसोलेटेड, सौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन जारी

होम आयसोलेटेड, सौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन जारी

Subscribe

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे बेड्स, ऑक्सिजन अशा अनेक गोष्टींचा तुटवडा भासू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज गुरुवारी होम आयसोलेटेड, सौम्य आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्या (एसिम्प्टोमॅटिक) रुग्णांसाठी एक नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनुसार रुग्णांमध्ये सुरुवातीला लक्षणे नसलेल्या किंवा लक्षणे नसलेल्यांनी घरीची होम आयसोलेशनमध्ये राहिले पाहिजे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन राहावे लागेल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाबाधित व्यक्तीची पूर्णपणे देखभाल केली पाहिजे. तसेच बाधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी सतत रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात राहिले पाहिजे. दरम्यान केंद्राच्या या नव्या गाई़डलाईनमध्ये नेमके काय दिले आहे ते पाहा…

- Advertisement -
  • ज्या रुग्णांना एचआव्ही, कॅन्सर आणि ट्रान्सप्लांट झाले आहे, त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
  • जे रुग्ण ६० वर्षांवरील आहेत आणि ज्यांना व्याधी आहेत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
  • कुटुंबातील जो पण व्यक्ती रुग्णांची देखभाल करेल आणि जास्त संपर्कात असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटोकॉलनुसार HCQ घ्यावे लागेल.
  • होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांनी अशा खोलीत राहा, जिथे क्रॉस व्हेंटिलेशन असेल आणि खोलीतील खिडक्या खुल्या असतील.
  • तसेच कोरोबाधित रुग्णांने ट्रिपल लेअरचा मास्क घालावा.
  • प्रत्येकी ८ तासांनंतर रुग्णाला मास्क बदलणे अनिवार्य आहे.
  • ज्यावेळेस रुग्णांच्या देखभाल होत असलेल्या खोलीत जाल, तेव्हा रुग्णांने आणि देखभाल करणाऱ्याने N95 मास्क घालावा.
  • जेव्हा मास्क बदलायचा असेल तेव्हा १ टक्के सोडियम हायपोक्लोराइटसोबत मास्क डिसइंफेक्ट केल्यानंतर फेकावा.
  • होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी जास्तीत जास्त जेवणात द्रव्य पदार्थांचा समावेश करावा. तसेच घरात राहणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला गेला आहे.
  • ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन मॉनिटर करण्यासाठी प्लस ऑक्सिमीटरचा वापर करणे अनिवार्य आहे. शिवाय दररोज प्रत्येकी ४ तासांला टेम्परेचर चेक करणे गरजेचे आहे.
  • रुग्णाला एकाच खोलीत राहावे लागले. त्याला पूर्ण घर फिरण्यास बंदी असेल.
  • तसेच घरातील इतर सदस्यांपासून दूर राहणे गरजेचे असेल.
  • महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने वृद्ध आणि आजारी व्यक्तीच्या जवळ जाऊ नये.

हेही वाचा – Corona Vaccination: लसीकरणासाठी वॉक इन सिस्टिम बंद होणार, मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण मोहीम ठप्प


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -