घरताज्या घडामोडीCorona Vaccination: लसीकरणासाठी वॉक इन सिस्टिम बंद होणार, मुंबईत पुढील ३ दिवस...

Corona Vaccination: लसीकरणासाठी वॉक इन सिस्टिम बंद होणार, मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण मोहीम ठप्प

Subscribe

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्यात आला. पण आता लसीचा अधिक तुटवडा भासत असल्यामुळे अनेक खासगी रुग्णालयात लसीकरण बंद असल्याचे समोर आले. तसेच आज मुंबईत लसीकरण मोहीमे उशीरा सुरुवात झाली. पण आता मुंबईतील लसीकरणासाठी वॉक इन सिस्टम बंद होणार असून लसीचा साठा नसल्यामुळे पुढील ३ दिवस मुंबईत लसीकरण मोहीम बंद राहणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. शिवाय त्यांनी या दिवसांमध्ये लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे नागरिकांना आवाहन केले आहे.

यामुळे आज लसीकरण मोहिमेला झाली उशीरा सुरुवात

सुरेश काकाणी म्हणाले की, काल (बुधवार) प्रसार माध्यमातून जाहीर केलं होत की आज (गुरुवार) उशीरा लसीकरण मोहीमेला सुरुवात होईल. केंद्र शासनाकडून जो लसीचा साठा मिळतो, तो काल रात्री उशीरा प्राप्त झाला. सकाळी लसींचे वाटप केले. त्यामुळे लसीकरण मोहीम १२ वाजल्यानंतरला सुरुवात होईल. तसेच ज्यांचा लसीचा दुसरा डोस आहे, त्यांनाच लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. ज्या लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, त्यांचांच जास्त विचार केला येईल, असे सांगूनही आज लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली हे सत्य आहे. परंतु इथून पुढे गर्दी होऊ नये, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांनाच फक्त लसीकरणाच्या मोहीमेत सामावू घेतलं जाईल. म्हणजेच वॉक इन सिस्टिम बंद केली जाईल आणि महत्त्वाचे म्हणजे ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे नागरिकांनी रजिस्ट्रेशन करा, अशी विनंती आहे. तसेच लसीचा दुसरा डोस असेल तर केंद्रावर जावे. दरम्यान आजचा लसीचा साठा संपत आलेला आहे, त्यामुळे पुढील ३ दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.

- Advertisement -

पुढे काकाणी म्हणाले की, मुंबईतील सर्वच केंद्रावर लसीकरण बंद राहिलं. काल रात्री मोजकाच लसीचा साठा मिळाला आहे. ७६ हजार डोसेस मिळाले आहेत, यापैकी दुपारपर्यंत ५० हजारांहून अधिक लसीचे डोस संपले आहेत. त्यामुळे उद्या आम्ही एखाद दुसरे केंद्राचा अपवाद वगळता सर्व केंद्रावर लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत बंद राहिलं. याची सर्व जनतेने दखल घ्यावी.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: राज्यात कडकडीत १५ दिवसांचा बंद पाळायलाच हवा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -