घरताज्या घडामोडीखासदार सुजय विखेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश

खासदार सुजय विखेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश

Subscribe

दिल्लीत तुटवडा असताना विखेंना १० हजार रेमडेसिवीर कुठूण मिळाले - न्यायालय

भाजप खासदार सुजय विखे यांनी आपल्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांसाठी दिल्लीहून खासगी विमानाने १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचा सांगितले होते. दिल्लीतून रेमडेसिवीर इंजेक्शन बेकायदेशीरपणे आणल्यामुळे सुजय विखेंविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली असून सुजय विखेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रेमडेसिवीर खरेदी करण्याची परवानगी फक्त राज्य सरकारला आहे. तसेच दिल्लीत तुटवडा असताना सुजय विखेंनी १० हजार रेमडेसिवीर विमानाने अहमदनगरला कसे आणले असा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाने केला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्या आणि वाटल्या प्रकरणी सुजय विखे यांच्या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे यांच्याविरोधात गुन्हा दाकल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. रेमडेसिवीर खरेदी करण्याची परवागी फक्त राज्य सरकारला आहे. तसेच दिल्लीत तुटवडा असताना विखेंना १० हजार रेमडेसिवीर कुठूण मिळाले असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच याबाबत कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी न्यायालयाने रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याची शंका व्यक्त केली होती.

- Advertisement -

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन बेकायदेशीरपणे आणले आणि वाटप केले. रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्याची परवानगी फक्त राज्य सरकारला आहे. मग खासदार डॉ.सुजय विखे यांनी हे रेमडेसिवीर इंजेक्शन कसे आणले असा सवाल करत औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. रेमडेसिवीर खरेदी करण्याची परवानगी फक्त राज्य सरकारला आहे. परंतु खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर महाराष्ट्रात खासगी विमानाने आणले तसेच ते परस्पर वाटून टाकले आहेत. मात्र सुजय विखे पाटील यांनी आणलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती हे माहित नाही तसेच इंजेक्शनचे वाटप बेकायदेशीरपणे करण्यात अल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

सुजय विखे पाटील यांनी काय म्हटले होते

सुजय विखेंनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत म्हटले आहे की, सर्व पक्षातील लोकांसाठी ही इंजेक्शन आहेत. त्यामुळे याचे कोणीही राजकारण करु नये, हा व्हिडिओ मुद्दाम दोन दिवस लेट अपलोड काल आहे. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती असे सुजय विखे पाटील यांन म्हटले आहे. तर माझ्याकडून जमेल तितकी मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न करत आहे. तरुण युवक तडफडत आहेत त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण आणू नये, ज्या लोकांनी मला खासदार केले आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडून जमेल तेवढी मदत मी करत आहेत. लोकांना डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही. हा पैसा कमवण्याचा धंदा नाही आहे तर लोकप्रतिनिधी म्हणून हे काम करणे माझी जबाबदारी आहे. याचे मला समाधान असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -