घरताज्या घडामोडीExit Poll Result 2021 Elections: ५ पैकी ३ राज्यांत सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा...

Exit Poll Result 2021 Elections: ५ पैकी ३ राज्यांत सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा संधी, भाजपला कुठे धक्का बसणार जाणून घ्या

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला १५२ ते १६३ जागा मिळू शकतात तर भाजपला १०९ ते १२९ जागांवर विजय मिळू शकतो.

देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा २०२१ निवडणुका पार पडल्या आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यांत निवडणूका पार पडल्या आहेत. पश्चिम बंगालमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पुर्ण झाले आहेत. या राज्यांतील एक्झिट पोल आता माध्यमांच्या हाती आला असून भाजपचे पारडे काही राज्यांमध्ये जड दिसत आहे. या निडणूकांचे निकाल येत्या २ दिवसांत समोर येतील. हे निकाल लागल्यावर देशातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नुकत्याच हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, तर टीएमसी एका राज्यात आणि लेफ्टची सत्ता एका राज्यात येणार असल्याचा अंदाज आहे. तसेच या पाच राज्यांत कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता त्या राज्यांतील नागरिकांना आहेच त्याचबरोबर देशातील राजकारणी आणि नागरिकांनाही आहे.

एक्झिट पोलमध्ये सी वोटरच्या अहवालानुसार असा अंदाज आहे की, पाच पैकी तीन राज्यातील जनतेने सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिले असल्याचे दिसते आहे. तर दोन राज्यांत मात्र सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णा द्रमुकच्या युतीला फार नुकसान होताना दिसत असल्यामुळे डीएमके आणि काँग्रेसला सत्ता मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पुद्दुचेरीत काँग्रेसची सत्ता होती मात्र एक्झिट पोलनुसार भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे पुद्दुचेरीत काँग्रेसला धक्का बसू शकतो. आसाम, केरळ, पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी आपली सत्ता कायम ठेवण्यास यश मिळवत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचार आणि रॅली, सभांमुळे पश्चिम बंगालमध्ये युद्धजन्य परिस्थिती झाली होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या प्रचारामुळे पश्चिम बंगालमध्ये १०० जागा मिळवण्याची शक्यता आहे. मात्र ममता बॅनर्जी आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरतील.

राज्यांनुसार एक्झिट पोल

पश्चिम बंगालमध्ये सी वोटरच्या सर्व्हेनुसार एक्झिट पोल असे सांगतो आहे की, पश्चि बंगालमध्ये २९२ जागांवर निवडणूक लढवण्यात आली. यामध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला १५२ ते १६३ जागा मिळू शकतात तर भाजपला १०९ ते १२९ जागांवर विजय मिळू शकतो. काँग्रेसला मात्र १४ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तामिळनाडूमध्ये एकूण जागा २३४ आहेत. यामध्ये १६० ते १७२ जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो तर भाजपला ५८ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना ७ जागांवर विजय मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनुसार आहे.

आसाममध्ये एकूण १२६ जागांवर निवडणूक घेण्यात आल्या आहेत. यातील ५८ ते ७१ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला ५३ ते ६६ जागा मिळतील आणि इतर पक्षांना ५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

केरळमध्ये १४० जागांवर निवडणूक घेण्यात आली यामध्ये एलडीएफ ७१ ते ७७ जागा तर यूडीएफ ६२ ते ६८ जागा मिळतील आणि भाजपला २ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

पुद्दुचेरीत एकूण ३० जागा आहेत याठिकाणी भाजपला १९ ते २३ जागांवर विजय मिळेल त काँग्रेसला ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे आणि तर पक्षांना १ ते २ जागा एक्झिट पोलनुसार मिळण्याची शक्यता आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -