घरताज्या घडामोडीCovid-19 लसीचा फॉर्म्युला रेसिपीसारखा वाटता येत नाही, बिल गेट्स यांचे धक्कादायक वक्तव्य

Covid-19 लसीचा फॉर्म्युला रेसिपीसारखा वाटता येत नाही, बिल गेट्स यांचे धक्कादायक वक्तव्य

Subscribe

विकसित देशातील नागरिकांना लस प्राधान्याने मिळण्यात काहीच गैर नाही, असेही मत बिल गेट्स यांनी मांडले आहे

जगभरातील अनेक देश सध्या कोरोनाविरोधी लढाईत आपआपल्या परीने अनेक पातळीवर झुंज देत आहेत. अशातच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे लसींबाबतच्या भारतविरोधी विधानाने चर्चेत आले आहेत. स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांना लसींच्या निमित्ताने इंटेलेक्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या सुरक्षा हटवण्याचा प्रश्न विचारला गेला होता. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट हटवला तर कोरोना लसीचे डोस पोचवण्यासाठी अधिक सुलभ होऊ शकेल का ? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. कोरोना विरोधी लसीचा फॉर्म्युलाच्या सुरक्षेबाबत केलेल्या विधानामुळे विधान केल्याने बिल गेट्स गेट्स सध्या चर्चेत आले आहेत.

बिल गेट्स यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, जगभरात लस निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. पण लसींच्या सुरक्षेच्या निमित्ताने अनेक लोक सध्या गांभीर्याने विचार करतात. म्हणूनच कोरोनाविरोधी लसीचा फॉर्म्युला शेअर करायला नको होता असे मत बिल गेट्स यांनी मांडले आहे. अमेरिकेची जॉन्सन एण्ड जॉन्सन कंपनी आणि भारतात लस तयारी करणारी कंपनी यांच्यात नक्कीच फरक आहे. महत्वाचे म्हणजे लस निर्मिती करताना खूप पैसा लागतो आणि कौशल्यही. त्यामुळेच एक यशस्वी लस निर्माण होणे शक्य होते असे बिल गेट्स म्हणाले.

- Advertisement -

वॅक्सीनचा फॉर्म्युला म्हणजे रेसिपी नव्हे…

वॅक्सिनचा फॉर्म्युला म्हणजे एखादी रेसिपी नाही. जशी रेसिपी सहज शेअऱ करता येते ती गोष्ट लसीच्या बाबतीत करता येत नाही. म्हणूनच लसीचा फॉर्म्युला हा फक्त इंटेलेक्युअल प्रॉपर्टीपुरता मर्यादित मुद्दा नाही. कारण लस बनवताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. तसेच अनेक चाचण्या कराव्या लागतात. अशा लसींसाठी ट्रायल होणे म्हणूनच गरजेचे आहे. लस तयार करताना प्रत्येक गोष्ट खूप सावधानतापूर्वक आणि पारखून तयार केली जाते. विकसित देशांनी कोरोना लसींसाठी स्वतःच्या देशांना प्राधान्य देणे यामध्ये काहीच चुकीचे नाही. सध्या अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ३० वर्षाच्या नागरिकांनाही लस दिली जदात आहे. तर ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत अद्यापही ६० वर्षाच्या नागरिकांचे लसीकरण होऊ शकलेले नाही. कोरोनाच्या संकटात असलेल्या भारतात येत्या दोन ते तीन महिन्यात लस सर्वांना देण्यात येईल असे अपेक्षित आहे. विकसित देशांमध्ये जेव्हा लसीकरण पुर्ण होईल, त्यानंतरच विकसनशील देशांमध्ये लस दिली जाईल असे बिल गेट्स यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

बिल गेट्स यांच्या विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. ब्रिटनच्या युनिवर्सिटी ऑफ एसेक्सच्या विधी विभागाच्या प्राध्यापक तारा वान हो यांनी ट्विट केले आहे की, बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार भारतातले मृत्यू थांबवता येणार नाहीत. पण पाश्चिमात्य राष्ट्रे कधी मदत करणार असा प्रश्न तारा वान हो यांनी केला आहे. अमेरिका आणि ब्रिटनने इंटेलेक्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या माध्यमातून विकसनशील देशांचा गळा दाबला आहे. हे खूपच घृणास्पद असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -