घरCORONA UPDATEcovid-19 : कोरोनातून बरे झाल्यानंतरही जाणवतोय अशक्तपणा? फॉलो करा हे उपाय

covid-19 : कोरोनातून बरे झाल्यानंतरही जाणवतोय अशक्तपणा? फॉलो करा हे उपाय

Subscribe

देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून दरदिवसा ३ लाखांहून अधिक रुग्ण एकट्या भारतात आढळत आहेत. दरम्यान रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, बेड्सच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे अनेक रुग्ण अगदी धौर्याने कोरोना आजारीशी सामना करत बाहेर पडत आहेत. दरम्यान देशात आढळणाऱ्या कोरोनाचा नव्या स्ट्रेनमुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कारण या नव्या स्ट्रेनमधील लक्षणे पटकन ओळखणे आरोग्य व्यवस्थेला अवघड होत आहे. त्यामुळे कोरोनाचा नव्या स्ट्रेनपासून वाचण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. दरम्यान कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांना बराच काळ शरीरात कमजोरपण जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना आपण कोरोनातून ठीक बरे झालो आहोत की नाही अशा द्विधा मनस्थित दिसतात. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेला रुग्णास बरे होण्यासाठी दोन आठवडे लागतात तर गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी चार आठवडे लागतात. परंतु यादरम्यान रुग्णाने तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच सकस आहार घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊन कोरोनातून बरे झाल्यानंतरही अशक्तपणा जाणव्यास काय करावे…

आहारात फळांचा समावेश करा

कोरोनातील बरे झालेल्या रुग्णांना शरारीत ताकद देण्याचे काम फळं करतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये डाळींब, सफरचंद, पपईसारख्या विविध फळांचा समावेश करा. त्यामुळे शरारीतील कमजोरी दूर होत रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

- Advertisement -

हंगामी भाज्यांचे सेवन

हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटामिन आणि खनिजांचे प्रमाण सर्वाधिक असते. जेवनामध्ये हंगामी भाजांचा वापर केल्यास शरारीतील ऊर्जाशक्ती वाढते. त्यामुळे हंगामी भाजांचे सेवन करत शरीरातील व्हिटामिनचे प्रमाण संतुलत करा.

भरपूर पाणी प्या

पाणी हे शरीरासाठी सर्वात उपयुक्त असा घटक आहे. त्यामुळे कोरोनासह कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्यासाठी शरीर डिहायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. यात तुम्ही नारळ पाणी, सरबतचाही समावेश करु शकता.

- Advertisement -

अंडी, मांस खा

अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, जामुन सारखे पदार्थ आपल्या शरीराला ताकद देत असतात, त्यामुळे कोरोनातून अधिक बरे वाटण्यासाठी चांगले शिजवलेली अंडी, मासांचे सेवन करा.

एँटीऑक्सिडेंट औषधे घ्या

दरम्यान कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही ड़ॉक्टरांचा सल्ल्यानुसार व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन आणि झिंकचा गोळ्या घ्या कारण त्यातून आपल्या शरीरातील नको असलेले घटक बाहेर पडण्यास मदत होईल.

गरम दूध प्या

दरम्यान कोरोनाबाधित रुग्णासाठी हळद घालेले गरम दूध अधिक फायदेशीर ठरते त्यामुळे रुग्णाची हाडे मजबूत होतात. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमुटभर हळद घालून ते प्यालास अधिक आराम मिळेल.

नियमित व्यायाम करा

सकस आहारसोबतच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. कारण कोरोनामुळे झालेल्या श्वसनासंबंधीत आजारांना श्वसनाचे व्यायाम दूर ठेवतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -