घरCORONA UPDATENagpur Corona Update: नागपूरात बाधितांच्या संख्येत घट, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

Nagpur Corona Update: नागपूरात बाधितांच्या संख्येत घट, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

Subscribe

पाच दिवसात नागपूरात १० हजारांनी रुग्णसंख्या घटली

महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्याला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढलेली पहायला मिळाली. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीला नागपूरमधील वाढती रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. नागपूरात ३० एप्रिलपर्यंत ७६ हजार ७०६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. मात्र मे महिन्यात या रुग्णसंख्येत घट झाली आहे. मे महिन्यात ही रुग्णसंख्या २५ हजार १५२ इतकी झाली आहे. केवळ पाच दिवसात नागपूरात १० हजारांनी रुग्णसंख्या घटली आहे.

नागपूरमध्ये शहरी पॉझिटिव्ह रेट कमी झाला आहे. मे महिन्यात म्हणजेच गेल्या पाच दिवसात नागपूरमध्ये १५ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागातही २४ हजार ७७९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील १० हजार ८९ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. नागपूरचा शहरी भाग रिकव्हर होण्याच्या दिशेने आहे. मात्र ग्रामीण भागात काही
ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्याने तिथली चिंता कायम आहे.

- Advertisement -

नागपूरचा रिकव्हरी रेट हा ७९.३७ टक्क्याहून थेट ८२.९२ टक्क्यांवर पोहचला आहे. ३० एप्रिलपर्यंत नागपूर जिल्ह्यात ७६ हजार ७०६ सक्रिय रुग्ण होते. मात्र मागच्या पाच दिवसात ही संख्या ६६ हजार ११६ वर पोहचली आहे. रोज नोंद करण्यात येणाऱ्या नवीन रुग्णांच्या तुलनेत दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांनी वाढल्याचे पहायला मिळाले आहे. तर गेल्या पाच दिवसात नागपूरात ४४० जणांचा मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसात नागपूरच्या शहरी भागात कोरोना बाधितांची टक्केवारी ही १९.१४ टक्के इतकी आहे. तर ग्रामीण भागात बाधितांची टक्केवारी ही ४०.७१ टक्के इतकी आहे.


हेही वाचा – Corona Update: चिंताजनक! देशातील कोरोना बळींची संख्या वाढली; ‘या’ राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -