घरक्रीडा'मिस्टर ३६०' पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार, 'या' मालिकेतून करणार पुनरागमन

‘मिस्टर ३६०’ पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार, ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन

Subscribe

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि ‘मिस्टर ३६०’ म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डीव्हिलियर्स पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. याबाबतचे संकेत देखील दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी तसे संकेत देखील दिले होते. दरम्यान, आता दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅम स्मिथ यांनी डीव्हिलियर्सच्या पुनरागमनासंदर्भात मोठ वक्तव्य केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेची वेस्ट इंडिज विरुद्ध जून महिन्यात टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेतून डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे, असं ग्रॅम स्मिथ यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी आणि ५ टी-२० सामन्यांच्या दौऱ्यासाठी येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये जाणार आहे. या मालिकेत डीव्हिलियर्स पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल असं स्मिथ म्हणाले.

- Advertisement -

डीव्हिलियर्स याच्यासोबत ख्रिस मॉरीस आणि इम्रान ताहीर देखील आफ्रिकेच्या टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही. डीव्हिलियर्स, मॉरीस आणि ताहीरचं संघात पुनरागमन होईल, अशी आपल्याला आशा आहे, असं स्मिथ म्हणाले. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटच्या संचालकांच्या या वक्तव्यामुळे डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाची आता केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी आहे, अशी चर्चा सुरु आहे.

एबी डीव्हिलियर्सने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने ११४ कसोटी सामन्यांमध्ये ५०.६६ च्या सरासरीनं ८७६५ धावा केल्या आहेत. यामध्ये २२ शतक आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे. डीव्हिलियर्सनं २२८ वन-डेमध्ये ५३.५ च्या सरासरीनं २५ शतक आणि ५३ अर्धशतकांच्या मदतीनं ९५७७ धावा केल्या आहेत. तर डीव्हिलियर्सने ७८ टी-२० सामन्यांमध्ये २६.१२ च्या सरासरीने १,६७२ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -