घरमनोरंजनडॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह व्यक्तव्याप्रकरणी सुनिल पालने ट्विट शेअर करत मागितली माफी

डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह व्यक्तव्याप्रकरणी सुनिल पालने ट्विट शेअर करत मागितली माफी

Subscribe

सुनिल पालने या व्यक्तव्याप्रकरणी माफी मागितली असून कोणाच्याही भावना दुखावल्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनिल पाल याने माफी मागणारे एक ट्विट शेअर केले आहे.

प्रसिद्ध हास्यकलाकार सुनील पालने डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह भाष्य करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या अध्यक्षा सुक्ष्मिता भटनागर यांच्या तक्रारीवरुन मंगळवारी पाल यांच्यावर अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील पाल याने एका हिंदी वृत्तपत्राशी संपर्क साधून डॉक्टरांविरोधात एक व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने डॉक्टरांचा उल्लेख राक्षस आणि चोर असा केला होता. परंतु आता सुनिल पालने या व्यक्तव्याप्रकरणी माफी मागितली असून कोणाच्याही भावना दुखावल्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनिल पाल याने माफी मागणारे एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये त्याने डॉक्टरांची माफी मागत हे ट्विट अनेकजणांना टॅग केले आहे. त्यामध्ये गृहमंत्री अमित शहा, पीएमओ, एम्स डॉक्टर्स असोसिएशन, सीएम महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

 सुनिल पाल हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतो. एका वाहिनीशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सुनील पालने नुकताच शेअर केला होता. २० एप्रिल रोजी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या अध्यक्षा सुक्ष्मिता भटनागर यांनी हा व्हिडिओ पाहिला. पाल यांनी यात कोरोना संकटात डॉक्टरांविरोधात जनतेच्या भावना भडकविणारे, लोकांना भयभीत करुन डॉक्टरांविषयी असंतोष निर्माण करणारी अनेक आक्षेपार्ह विधाने केली. यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे १२ हजार डॉक्टर आणि ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेने अंधेरी पोलिसांकडे लेखी तक्रार केली.

- Advertisement -

हे वाचा-  रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या वेळ आणि दिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -