घरमनोरंजनViralvideo: CCTV फुटेज शेअर करत श्वेता तिवारी म्हणाली, शारिरीक शोषण नाही तर...

Viralvideo: CCTV फुटेज शेअर करत श्वेता तिवारी म्हणाली, शारिरीक शोषण नाही तर काय आहे?

Subscribe

आरोप प्रत्यारोपाच्या या खेळी नंतर श्वेताने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक व्हिडिओ शेअर करत आणि लिहले आहे की, आता सत्य बाहेर येईल.

छोट्या पद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त तिच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर तसेच माध्यमांवर मोठ्या प्रमाणात रंगतात. अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचा पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनव हा श्वेताचा दुसरा नवरा असून त्याच्या कडून तिला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकारानंतर श्वेता आणि तिची मुलगी पलक या दोघींनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनवने श्वेता मुलाला भेटू न देण्याचा तसेच शूटिंग दरम्यान मुलाला एकटं सोडल्याचा असल्याचे आरोप केले होते. तसेच अभिनवने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्वेतावर मुलाला बेकायदेशीररित्या ताब्यात घेत असल्याचा आणि “अज्ञात ठिकाणी” ठेवत असल्याचा आरोप करताना दिसत आहे.आरोप प्रत्यारोपाच्या या खेळी नंतर श्वेताने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक व्हिडिओ शेअर करत आणि लिहले आहे की, आता सत्य बाहेर येईल.मी माझ्या लहान मुल असल्यामुळे मला त्याची भीती वाटते.या घटनेनंतर माझा मुलगा जवळजवळ 2 महिने घाबरला होता. आजही त्याला भीती वाटते की त्याचे वडील त्याला भेटायला घरी येत आहेत. मला या वयात माझ्या मुलाला मानसिक त्रासात जाऊ देण्याची इच्छा नाही. मी मुलाची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा माणूस मुलाचे मानसिक आरोग्य बिघडावे म्हणून प्रयत्न करतो.जर हे शारीरिक शोषण नाही तर मग काय आहे? ‘

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

- Advertisement -

श्वेता तिवारीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक कलाकार तसेच चाहते श्वेताच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेकांनी श्वेताला संपूर्णपणे पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या श्वेता केप टाऊन मध्ये असून ‘खतरो के खिलाडी’ या रियालिटी शो मध्ये दिसणार आहे.


हे हि वाचा – अर्जुन कपूरची पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल म्हणाला,मदर्स डे चा प्रचंड तिरस्कार आहे…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -