घरमनोरंजनअभिनेता सोनू सुदने चीन नंतर आता फ्रान्सकडून मागवले ऑक्सिजन प्लांट्स !

अभिनेता सोनू सुदने चीन नंतर आता फ्रान्सकडून मागवले ऑक्सिजन प्लांट्स !

Subscribe

तसेच 10-12 दिवसांमध्ये फ्रांस मधून ऑक्सिजन प्लांट भारतात दाखल होतील.असे देखील सांगण्यात येत आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक कोरोनारुग्ण दगावत आहेत. देशभरात कोरोना व्हायरसची गंभीर स्थिति पाहता अनेक बॉलिवूड कलाकार लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच सावट कायम असताना सोनू सुद सुरुवाती पासूनच मसीहा बनून लोकांच्या मदतीकरिता धावत आहे. कोरोना व्हायरस दरम्यान लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेला सर्वाधिक सामोरे जावे लागत आहे. सोनू सुदने सर्वात आधी  चीनच्या मदतीने भारतात ऑक्सिजन कंस्टेट्रर्स मागविले होते. आता हा मदतीचा ओघ सुरू असतानाच सोनू सुद याने फ्रान्स मधून सुद्धा ऑक्सिजन प्लांट मागवले आहेत. एक स्टेटमेंट प्रकाशित करून सोनू सुदने याबद्दल माहिती दिली आहे. “देशभरमध्ये ऑक्सिजनची कमतरता पाहता,मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट मागवण्यात आले आहेत. यामुळे देशभरातील ऑक्सिजनच्या कमतरतेला   आळा बसू शकतो. सगळ काही वेळेत होईल. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत आता ऑक्सीजन सिलेंडर्सला योग्य ठिकाणी योगी रुग्णालयात पोहचवण्यात येईल. या वेळी हे सर्वाधिक  महत्वाचे आहे की लोकांची योग्य वेळी मदत करून त्यांचा जीव वाचवणे ”

- Advertisement -

पहिल्या ऑक्सिजन प्लांटचे ऑर्डर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 10-12 दिवसांमध्ये फ्रान्स मधून ऑक्सिजन प्लांट भारतात दाखल होतील. असे देखील सांगण्यात येत आहे.


हे हि वाचा – रुके ना तू थके ना तू, झुके न तू म्हणत बिग बींनी दिल्या कोरोना योद्धांना अनोख्या शुभेच्छा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -