घरमनोरंजनश्री श्री रविशंकर' यांच्या जीवनपटावर आधारिच सिनेमा, 'फ्री - द अनटोल्ड स्टोरी...

श्री श्री रविशंकर’ यांच्या जीवनपटावर आधारिच सिनेमा, ‘फ्री – द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर’ लवकरच….

Subscribe

गुरु रविशंकर यांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस या सिनेमात दाखविले जाणार आहे.

अध्यात्मिक गुरु म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले श्री श्री रविशंकर यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फ्री – द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. आज १३ मे रोजी श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिनादिवशी याबाबत घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण भव्य प्रकारे करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा जगातील 150 देशांमध्ये 21 भाषांमध्ये रिलिज केला जाणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असले तरी यात रविशंकर यांची भूमिका कोण साकारणार ही गोष्ट अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे रविशंकर यांची भूमिका साकारणारा चेहरा हा नवा असेल की बॉलिवूकडमधीलच कोणी असेल याची उत्सुकचा प्रेक्षकांना लागली आहे. चित्रपटाबाबात आणखी मोठे निर्णय घेणे बाकी आहे, त्याबाबत लवकरच घोषणा होतील’, असं सूत्रांनी सांगितलं.

‘फ्री – द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर’ या चित्रपटाची निर्मिती महावीर जैन यांची कंपनी ‘सनडायल एंटरटेनमेंट’ आणि ‘लायका ग्रुप’ नं केली आहे. ‘फ्री- द अन्टोल्ड स्टोरी ऑफ गुरूदेव श्री श्री रवि शंकर’ चं दिग्दर्शन मॉन्टू बस्सी करणार आहेत. त्यांनीच सिनेमाचं लेखन देखील केलं आहे. गुरु रविशंकर यांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस या सिनेमात दाखविले जाणार आहे. सोबतच श्री श्री रविशंकर यांचा अध्यात्मिक गुरू होण्याचा प्रवास यात दाखवला जाणार आहे.

- Advertisement -

हे वाचा- …म्हणून मधुबाला आजारी असताना शेवटच्या काळात किशोरकुमार यांनी तिला एकटे सोडले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -