घरताज्या घडामोडीMucormycosis: ‘अ‍ॅम्फोटेरिसीन बी’ औषधाचा तुटवडा नाही; NITI आयोगाचे स्पष्टीकरण 

Mucormycosis: ‘अ‍ॅम्फोटेरिसीन बी’ औषधाचा तुटवडा नाही; NITI आयोगाचे स्पष्टीकरण 

Subscribe

म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी सध्या ‘अ‍ॅम्फोटेरिसीन बी’ हे औषध डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

भारतामध्ये कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यातच आता अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा बुरशीजन्य आजार बळावत चालला आहे. कोरोनातून बरे झालेल्या किंवा कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका आहे. या आजाराच्या उपचारासाठी सध्या ‘अ‍ॅम्फोटेरिसीन बी’ हे औषध डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. अनेक राज्यांमधून या औषधाची मागणी वाढत आहे. त्यामुळे लवकरच या औषधाचा तुटवडा भासू शकेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतु, अ‍ॅम्फोटेरिसीन बी औषधाच्या देशातील उपलब्धतेबाबत समस्या नसल्याचे आता नीती आयोगाने स्पष्ट केले आहे.

बारकाईने लक्ष ठेवून आहोत

म्युकरमायकोसिसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅम्फोटेरिसीन बी’ या औषधाच्या देशातील उपलब्धतेबाबत कोणतीही समस्या नाही. आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना आवश्यकतेनुसार हे औषध उपलब्ध करण्याची दक्षता घेऊ, असे नीती आयोगाच्या (आरोग्य) सदस्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

औषधाची आयात, देशातली निर्मिती वाढवण्यावर भर

तसेच अ‍ॅम्फोटेरिसीन बी औषधाची मागणी वाढत आहे. त्यामुळे सरकारने या औषधाची आयात आणि देशातली निर्मिती वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आयातदार आणि औषध उत्पादकांसोबत चर्चा करुन या औषधाच्या साठ्याचा आणि मागणीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना १० मेपासून ३१ मेपर्यंत औषधांचा पुरवठा केला जाईल. राज्यांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील या औषधाच्या वाटपासाठी यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -