घरताज्या घडामोडीराजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड, चंद्रकांतदादा पाटील यांचा घणाघात

राजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड, चंद्रकांतदादा पाटील यांचा घणाघात

Subscribe

काँग्रेसच्या टूलकिटमधील धक्कादायक सूचनांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ‘इंडियन स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हटले जावे, अशी सूचना

काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याची प्रचार योजना आखल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संघर्ष करत असताना अशा प्रकारे देशाच्या विरोधात काम करणे निषेधार्ह आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत भारत कोरोनाविरुद्ध लढत असतानाच काँग्रेसची सुरु असलेली कृष्णकृत्ये उघड झाली आहेत. काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन देशहितासाठी उत्तम-उन्नत कार्य करावे असे माझे कळकळीचे आवाहन केले आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सोशल मीडियाच्या जगात ज्याला टूलकिट म्हणतात असे काँग्रेस पक्षाचे एक सूचनापत्र उघडकीस आले आहे. त्यामध्ये मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काय काय करावे याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राजकीय विरोधासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्यापर्यंत काँग्रेस गेली. तसेच कोरोनाच्या प्रसाराबाबतही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून निवडक टीका करण्याचे डावपेच काँग्रेसने आखल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक आणि निंदनीय आहे. या सर्व प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

- Advertisement -

ते म्हणाले की, काँग्रेसच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या या टुलकिटमध्ये शतकानुशतकांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक असणारा कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याची चर्चा करण्याची सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुपर स्प्रेडर कुंभ असा नॅरेटीव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असून तो आणखी वाढविण्यासाठी समविचारी आंतरराष्ट्रीय मीडिया व पत्रकारांशी हातमिळवणी करण्याची सूचना त्यामध्ये देण्यात आली आहे. ईदसाठी जमलेल्या गर्दीबाबत मात्र कोणतीही टिप्पणी करू नये, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.

केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते कोरोना काळात जनतेला मदत करत आहेत असे भासवण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि व्हेंटिलेटर सारखी इतर सामुग्री अडवून ठेवावी आणि केवळ काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच ती उपलब्ध करून दिली जावी, अशी आणखी एक अमानूष सूचना या टूलकिटमध्ये आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या टूलकिटमधील धक्कादायक सूचनांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ‘इंडियन स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हटले जावे, अशी सूचना आहे. यासोबतच पीएम केअर फंडबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे सातत्याने संभ्रम निर्माण केला जावा आणि जर एखाद्या सेलिब्रिटीने यामध्ये दान केले तर त्यांना सोशल मीडियावर टार्गेट करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. ते म्हणाले की, एकूणच हे टूलकिट धक्कादायक असून त्याची निर्मिती व त्याचा वापर या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणांनी सखोल तपास करून कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

काँग्रेसला माझे कळकळीचे आवाहन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशाची फाळणी आणि विरोधकांबद्दल गरळ ओकत राहणे यावर काँग्रेसने प्रभुत्व मिळवले आहे. भारत कोरोनाविरुद्ध लढत असतानाच काँग्रेसची सुरु असलेली कृष्णकृत्ये उघड झाली आहेत. काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन देशहितासाठी उत्तम-उन्नत कार्य करावे असे माझे कळकळीचे आवाहन आहे. संपूर्ण भारत कोरोनाशी लढण्यासाठी एकजूट झाला आहे आणि त्याचवेळी काँग्रेस केवळ राजकीय विरोधा साठी कोरोनाशी चाललेल्या लढाईत साथ न देता, देशात असंतोष निर्माण करण्यासाठी फेक आणि नकारात्मक बातम्या पसरवत आहे. हे कृत्य लांच्छनास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर आणि पीएम केअरवर आरोप , तज्ञांवर शंका-कुशंका, लसीकरणाबाबत गोंधळ निर्माण करण्याला चालना,व्हेंटिलेटर कॉंट्रोव्हर्सी..काँग्रेसची कृष्णकृत्ये थांबतच नाहीत. या दुष्कृत्यांचे फळ वेळ येताच त्यांना भारतीय जनता अवश्य देईल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -