घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: बार्ज दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार, गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Cyclone Tauktae: बार्ज दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार, गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Subscribe

केंद्र सरकारने राज्यालाही मदत करावी

तौत्के चक्रीवादळामुळे वित्तहानी आणि जिवितहानी झाली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांना तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले होते परंतु निष्काळजीपणा केल्यामुळे बॉम्बे हायजवळील बार्जवर असलेले कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. अरबी समुद्रात लाटांच्या तडाख्याने आणि वादळी वाऱ्यामुळे बार्जवरील कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या या दुर्घटनेतत २६ जणांचे मृतदेह सापडले आहेत तर अजूनही ४९ ते ६७ जण बेपत्ता आहे.

बार्ज पी- ३०५ दुर्घटनेत आतापर्यंत २६१ लोकांपैकी १८६ जणांना वाचवण्यात आले आहे. २६ जणांना मृतदेह सापडले असून अद्यापही ४९ ते ६७ जण बेपत्ता आहेत. दुर्दैवाने दुर्घटना घडली आहे. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जो अलर्ट देण्यात आला होता. तो सगळ्याच यंत्रणांना आणि सगळ्यांना देण्यात आला होता. नियमानुसार सर्वठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्राने राज्यालाही मदत करावी

केंद्र सरकारने गुजरातला १ हजार कोटींची मदत दिली आहे. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार आहेत. गुजरातला मदत केली त्याबद्दल कोणालाही तक्रार असण्याचे कारण नाही. परंतु मागच्या निसर्ग चक्रीवादळामध्ये सुद्धा आणि आता तौत्के चक्रीवादळामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान महाराष्ट्रात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच बरोबरीने महाराष्ट्रालाही मदत करावी अशी त्यांच्याकडून आपेक्षा असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाची दिशा अहवालानंतर ठरणार

मराठा आरक्षण ही कायदेशीर प्रक्रिया आहे. कायदेशीर प्रक्रियेध्ये मराठा आरक्षणाच्या उपसमितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ लावण्यासाठी समिती स्थापन केली आहे. न्यायमुर्ती जस्टिस दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती त्यांचा अहवाल सादर करेल यानंतर मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यात येईल अशी महिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -