घरताज्या घडामोडीदेशात कोरोनाचे लाखो मृत्यू अ‍ॅलोपॅथीने, बाबा रामदेव यांचा आरोप, IMA चा निषेध

देशात कोरोनाचे लाखो मृत्यू अ‍ॅलोपॅथीने, बाबा रामदेव यांचा आरोप, IMA चा निषेध

Subscribe

IMA मार्फत कारवाईची मागणी

अ‍ॅलोपॅथीचा तमाशा आहे. अ‍ॅलोपॅथी म्हणजे स्टुपिड आणि दिवालिया सायन्स असल्याचे धक्कादायक वक्तव्य योग गुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. जितके मृत्यू बेड्स न मिळाल्याने किंवा ऑक्सिजनअभावी हॉस्पिटलमध्ये झाले नाहीत, त्यापेक्षा लाखो मृत्यू हे अ‍ॅलोपॅथीने झाले असे वादग्रस्त वक्तव्य सोशल मिडियावर व्हिडिओतून व्हायरल झाले आहे. या वक्तव्यामुळे आता इंडियन मेडिकल असोसिशएनने या वक्तव्याचा निषेध करत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडेही याबाबतची तक्रार केली आहे. बाबा रामदेव यांनी १२०० डॉक्टरांच्या बलिदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचा दावा IMA मार्फत करण्यात आला आहे. या संपुर्ण आव्हानाच्या काळामध्ये डॉक्टरांचे खच्चीकरण करणारे हे वक्तव्य आहे. संपुर्ण कोरोनाविरोधी लढ्यामध्ये मेडिकल डॉक्टरांनी फ्रंटलाईन योद्ध्यासारखी कामगिरी केली आहे. तसेच संपुर्ण लढाईत संपुर्ण यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून या डॉक्टरांनी रूग्णांची सेवा केली आहे. स्वयंघोषित बिझनेसमेन बाबा रामदेव हे डॉक्टरांच्या विरोधी द्वेष पसरवत आहेत. तसेच डॉक्टर आणि रूग्णांमधील नातेही बिघडवत असल्याचा दावा IMA ने केला आहे.

- Advertisement -

 

काय आहे बाबा रामदेव यांचे वक्तव्य ?

रेमडेसिवीर, अॅन्टीबायोटिक, प्लाझ्मा थेरपीवर बॅन आले, फॅव्ही फ्लू हे सगळ अपयशी ठरत आहे. तापाच कोणतही औषध उपयुक्त ठरत नाही. त्या व्हायरस, बॅक्टेरियाला, फंगसला ज्या कारणाने संसर्ग होत आहे त्यावर औषध देण्यात येत नाही. लाखो लोकांचा मृत्यू हा अॅलोपॅथिचे औषध खाल्याने झाली आहे. जितके मृत्यू ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळल्याने झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे अॅलोपॅथीचे औषध खाऊन झाले असल्याचे अतिशय धाडसी वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले. मी खूपच मोठे वक्तव्य करत आहे, या वक्तव्यानंतर या मुद्द्यावर वाद निर्माण होऊ शकतो असेही बाबा रामदेव म्हणाले. स्टेरॉईड्समुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण अॅलोपॅथी आहे. अॅलोपॅथी संपुर्णपणे फेल आहे, असे मी म्हणत नाही. त्यावेळी मॉडर्न मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञानाला माझा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण वेगवेगळे प्रयोग आणि त्याचे निष्कर्षावर त्यांनी बोट ठेवले.

- Advertisement -

IMA मार्फत कारवाईची मागणी

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) मार्फत योग गुरू रामदेव यांनी सोशल मिडियावर अॅलोपॅथीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. IMA मार्फत केंद्रीय मंत्री यांच्याकडे कारवाईची मागणी करत एपिडेमिक डिझिज अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. अन्यथा मॉडर्न मेडिकल फॅसिलिट रद्द करावी अशी विनंतीही IMA मार्फत करण्यात आली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -