घरट्रेंडिंगVideo: मोदकाचा प्रसाद ATM मशिनमधून

Video: मोदकाचा प्रसाद ATM मशिनमधून

Subscribe

कार्ड स्वाईप केल्यानंतर भक्तांना मोदकाचा प्रसाद देणाऱ्या या अनोख्या ATM मशीनचे देशभरातून कौतुक होत आहे.

गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पासोबतच त्याचे भक्तही मोदकाच्या प्रवासाची आतुरतेने वाट पाहत असतात. मोदक मग ते उकडीचे असो, तळलेले किंवा मिठाईचे प्रत्येकालाच ते प्रिय असतात. याच धर्तीवर पुणातल्या एका गणेश भक्तीने खास मोदकाचा प्रसाद देणारं ATM मशीन तयार केलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात या खास एटीएम मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. एका विशिष्ट कार्डच्या साहाय्याने तुम्ही या मशीनमधून चक्क मोदक मिळवू शकता. पुण्याच्या शंकर नगरमध्ये या खास ‘एटीएम’ (एनी टाईम मोदकची) निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या गणपती स्पेशल एटीएम मशीनचा व्हिडिओ देखील व्हायरल होतो आहे. कार्ड स्वाईप केल्यानंतर भक्तांना मोदकाचा प्रसाद देणाऱ्या या अनोख्या एटीएम मशीनचे देशभरातून कौतुक होत आहे.

व्हिडिओ सौजन्य- ANI

- Advertisement -

पुण्याचे रहिवासी असलेले संजीव कुलकर्णी यांनी या खास ‘एनी टाईम मोदक’ मशीनचा शोध लावला आहे. बॅंकेच्या एटीएम मशीनच्या बटणांवर १ ते ९ आकडे असतात. मात्र, या ATM मशीनमध्ये बटणांवर जागी दान, क्षमा, शांती, सदाचार, प्रेम, भक्ती, भावना, ज्ञान, स्नेह, सुख, निष्ठा, मोद आणि समाधान हे शब्द लिहीले आहेत. या मशीनमध्ये वापरण्यासाठी एका खास एटीएम कार्डाचीही निर्मिती केली आहे. हे कार्ड मशीनमध्ये टाकून कुठलेही बटण प्रेस केले की मोदकाची एक छोटी डबी बाहेर येते. या डबीच्या आतमध्ये एक छोटासा मोदक आधीपासूनच असतो. मशीनमधून बाहेर येणाऱ्या मोदकाच्या प्रत्येक डबीवर ‘ओम‘ लिहिलेले असते. दरम्यान तंत्रज्ञान आणि संस्कृतीला एकत्र पुढे नेण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं, संजीव कुलकरर्णी यांनी म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -