घरताज्या घडामोडीसारथीची बैठक १ जूनला होणार, ४१ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची विनायक मेटेंची...

सारथीची बैठक १ जूनला होणार, ४१ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची विनायक मेटेंची माहिती

Subscribe

एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २ वर्षात पीएचडी पूर्ण करावी असा निर्णय घेण्यात आला

पीएचडी करणाऱ्या २४१ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येऊन त्यांन फेलोशिप देण्यात येणार आहे. याबाबत सारथी संस्थेच्या महामंडळाची बैठक १ जूनला होणार आहे. या बैठकीत M.Phill (एम फील) विद्यार्थ्यांनाही पीएचडी करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले आहे. विनायक मेटे यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत सारथीच्या प्रश्नावर निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २ वर्षात पीएचडी पूर्ण करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १ पैशाचीसुद्धा फेलोशिप मिळाली नव्हती यामुळे अनेकांचे संशोधनाचे कार्य थांबले होते. पुढे गेले होते अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही विद्यार्थ्यांना अभ्यास बंद करावं की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. याचबरोबर जे एम फील करणारे विद्यार्थी होते. केंद्र सरकारने एम फील कोर्स बंद केल्यामुळे त्यांना पीएचडी करण्याची परवानगी द्यावी असा एक मोठा विषय होता. यानंतर इतरही बाकी विषय होते.

- Advertisement -

दरम्यान या अनुषंगाने सोमावीर निंबाळकर साहेब आणि काकडे यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या समवेत बैठक घेण्यात आली आहे. तसेच १ जूनला सारथीच्या संचालक महामंडळाची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत पत्रक काढण्यात येणार आहे. १ जूनला २४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुलाखती दिल्या आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे गुणांकन करुन या ताबडतोब यांचे बॉंड काढून त्यांना फेलोशिप देण्यात येईल असा निर्णय देण्यात आला आहे.

एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २ वर्षात पीएचडी पूर्ण करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वांना १ जूनच्या बैठकीत मान्यता देण्यात असून त्याबाबतही पत्रक काढण्यात येणार असल्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. बारटी संस्थेत जेव्हा पासून नोंदणी झाले आहे तेव्हापासून फेलोशिप देण्यात यावी असा निर्णयही घेण्यात आला आहे. आता फक्त ५ ते ६ कर्मचारी आहेत. त्या ठिकाणी ४१ कर्मचारी, अधिकारी यांना कामावर घेण्यात येण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे येत्या १ महिन्यात भर्ती होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सारथीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. तसेच या बैठकीत ठरल्याप्रमाणे १०० टक्के निर्णय होतील असा विश्वास आहे. असे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -