घरदेश-विदेशRoche-Cipla Corona Medicine: कोरोनावर आणखी एका औषधाचा पर्याय, जाणून घ्या एका डोसची...

Roche-Cipla Corona Medicine: कोरोनावर आणखी एका औषधाचा पर्याय, जाणून घ्या एका डोसची किंमत

Subscribe

देशातील कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, Roche india Cipla या आघाडीच्या औषध कंपनीने अत्यंत महागडे कोरोनावरील औषध बाजार उपलब्ध केले आहे. कोरोना बाधित रूग्णाला हे औषध दिल्याने कोरोना रूग्ण बरा होतो. तसेच या औषधाने कोरोना रूग्णांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात, असा या औषधाबद्दल दावा केला जात आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत साधारण ६० हजार रुपये आहे.

सोमवारी Roche आणि Cipla या दोन्ही कंपन्यांनी भारतात अँटीबॉडी कॉकटेल आणण्याची घोषणा केली. या औषधाच्या एका डोसची किंमत ५९ हजार ७५० रूपये असून या औषधाचा वापर गंभीर कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. अँटीबॉडी कॉकटेलची पहिली खेप भारतात उपलब्ध झाली आहे, तर दुसरी खेप जून महिन्याच्या मध्यापर्यंत ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच सध्या उपलब्ध असणाऱ्या या औषधाच्या एकूण डोसनी साधारण दोन लाख रूग्णांवर उपचार केले जाऊ शकतात,असे Roche आणि Cipla कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Cipla कंपनी देशभरात त्याच्या वितरण क्षमतेच्या सहाय्याने हे औषध वितरित करणार असल्याचे सांगितले जात आहे, प्रत्येक कोरोना बाधित रूग्णाला आवश्यक असणाऱ्या एका डोसची किंमत सर्व करांसह ५९ हजार ७५० रूपये असणार आहे. यासह हे औषध मोठ्या रुग्णालयात आणि कोविड उपचार केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -