घरताज्या घडामोडीकोविड सेंटरमधील झिंगाट डान्सवरुन दरेकरांची रोहित पवारांसोबत जुंपली

कोविड सेंटरमधील झिंगाट डान्सवरुन दरेकरांची रोहित पवारांसोबत जुंपली

Subscribe

सामान्यांना एक न्याय आणि रोहित पावर शरद पवारांचे नातू असल्याने त्यांना एक न्याय का?

कर्जत येथील गायकरवाडी कोविड सेंटरमधील रुग्णांमध्ये असलेलं वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी झिंगाट गाण्याच्या तालावर रोहित पवारांनी ठेकाल धरला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना लोकप्रतिनीधी अशा प्रकारे पीपीई कीट न घालता डान्स करतात. राज्यातील राजकारण्यांना वेगळा न्याय आणि शरद पवार यांचे नातू असल्यामुळे रोहित पवारांना वेगळा न्याय का अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं ही पवार कुटुंबाची संस्कृती असून तीही आमची एक ओळख असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

आमदार रोहित पवार यांचा झिंगाट गाण्यावरील डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांवर टीका करत शरद पवार यांचे नातू असल्याने वेगळा न्याय असे म्हटले आहे. यावर रोहित पावरांनी म्हटले आहे की, सन्माननीय विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

लोकांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं ही पवार कुटुंबाची संस्कृती असून तीही आमची एक ओळख आहे. हे कुणाला चूक वाटलं तरी त्याची पर्वा नाही आणि त्यात बदलही होणार नाही. मी एकटाच नाही तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराचे सर्व लोकप्रतिनिधी असंच काम करतात. माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे.

- Advertisement -

आणि हो… ५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का? असा रोहित पवार यांनी प्रवीण दरेकरांना केला आहे.

दरेकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

आमदार रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरला जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला आहे. तो निषेधार्ह आहे. ते कोणतंही पीपीई किट न घालता कोविड सेंटरमध्ये गेले होते. यामुळे ते कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सामान्यांना एक न्याय आणि रोहित पावर शरद पवारांचे नातू असल्याने त्यांना एक न्याय का? असा प्रश्न विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -