घररायगडलसीकरणासाठी मोबाईल व्हॅन मुरुडमध्ये

लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन मुरुडमध्ये

Subscribe

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, शिवभोजन केंद्र चालक, गोदामातील हमाल, वाहन चालक, घरगुती गॅस पुरवठा करणारे वितरक आणि कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी यांना कोविड लस मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नवी मुंबईस्थित ओम गगनगिरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरणसाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली असून, बुधवारी येथे त्याचा अनेकांनी लाभ घेतला

तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार गमन गावीत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनचे अध्यक्ष गिरीष साळी, सचिन कासेकर, नायब तहसीलदार रवींद्र सानप, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविन्द कौटुंबे, गोदाम व्यवस्थापक सचिन राजे, पुरवठा अधिकारी केतन भगत, डॉ. प्रताप शेंडगे, विकास शेंडगे, मारुती घेरदे, प्रसाद हंकारे, परिचारिका आरती म्हात्रे आदी उपस्थित होते. मोबाईल व्हॅनमुळे लसीकरणाची सुविधा जलद उपलब्ध झाल्याबद्दल गावित यांनी समाधान व्यक्त केले. तर तालुक्यात स्वस्त धान्याची ३२ दुकाने असून, तेथील सर्वांचे लसीकरण होणार असल्याचे साळी यांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -