घरक्रीडाAsian Boxing Championship : मेरी कोम सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर; अंतिम फेरीत...

Asian Boxing Championship : मेरी कोम सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर; अंतिम फेरीत प्रवेश

Subscribe

५४ किलो वजनी गटात भारताच्या साक्षीलाही अंतिम फेरी गाठण्यात यश आले.

सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद (Asian Boxing Championship) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सुवर्णपदकापासून ती आता केवळ एक पाऊल दूर आहे. ५१ किलो वजनी गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात मेरीने मंगोलियाच्या लुत्साइखान अल्तन्तसेत्सेगचा ४-१ असा पराभव केला. तसेच ५४ किलो वजनी गटात भारताच्या साक्षीलाही अंतिम फेरी गाठण्यात यश आले. दोन वेळच्या युवा विश्वविजेत्या साक्षीने अव्वल सीडेड कझाकस्तानच्या डिना झोलामनवर ३-२ अशी मात केली. मोनिकाला (४८ किलो) मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मेरीने केला प्रतिहल्ला 

मेरीने ५१ किलो वजनी गटात उपांत्य फेरीमध्ये मंगोलियाच्या लुत्साइखान अल्तन्तसेत्सेगचा ४-१ असा पराभव केला. या सामन्यात लुत्साइखानने चांगली झुंज दिल्याने मेरीला आपला अनुभव पणाला लावावा लागला. लुत्साइखानने या लढतीत आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेरीने हूकचा चांगला वापर करत प्रतिहल्ला केला. याचे लुत्साइखानला उत्तर न देता आल्याने मेरीने हा सामना जिंकला. आता अंतिम फेरीत तिच्यासमोर कझाकस्तानच्या नाझीम कीझाईबेचे आव्हान असेल.

- Advertisement -

मोनिका उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

त्याआधी ४८ किलो वजनी गटात मोनिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत तिला कझाकस्तानच्या अलुआ बाल्कीबेकोव्हाने ०-५ असे पराभूत केले. तसेच बुधवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आशिष कुमारचा (७५ किलो) कझाकस्तानच्या अमानकुलने २-३ असा पराभव केला होता.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -