घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी यांच्यात अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का?, जयंत पाटील यांचं भाजपवर...

पंतप्रधान मोदी यांच्यात अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का?, जयंत पाटील यांचं भाजपवर टीकास्त्र

Subscribe

सोलापूरकरांचा उजनीच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे तो कोणीही हिरावून घेणार नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने कोल्हापुरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली तसेच २ दिवसीय अधिवेशनाची मागणी केली. राज्य सरकारमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का? असे म्हणत महाविकास आघाडीला चंद्रकांत पाटील यांनी डिवचले आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का? असे टीकास्त्र भाजवर डागले आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील पुण्यातील पुर्वनियोजित बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षातील नेते महाविकास आघाडीवर नेहमी टीका करत असतात यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनासंबंधित केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी म्हटलंय की, पंतप्रधान मोदी यांच्यात अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही. या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. कोरोना असल्याने लोकप्रतिनिधी येऊ शकत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अधिवेशन मर्यादित केले होते. सर्वच राज्यात सारखीच परिस्थिती असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान जंयत पाटील यांनी उजनी पाणी प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूरकरांचा उजनीच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे तो कोणीही हिरावून घेणार नाही. त्यामुळे सोलापूरच्या वाटेचे पाणी कुठेही जाऊ देणार नाही. असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने अधिवेशन बोलवावे – चंद्रकांत पाटील

राज्य सरकारमध्ये राज्याचं अधिवेशन घेण्याची हिम्मत नाही. अधिवेशन बोलवायला किती वेळ लागतो फक्त राज्यपालांना पत्र लिहावे लागते असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. कोल्हापुरमध्ये मराठा समाजाने केलेल्या आंदोलनात चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांन म्हटलंय की, जो पर्यंत २ वर्ष कायदा असताना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यांना नियुक्ती पत्र द्या, ४ तारखेच्या आधी जर तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल केली नाही तर राज्य सरकारला करताय येणार नाही. त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, मागास आयोग गेले दीड वर्ष महाराष्ट्रात नाही आहे. याची कशाला वाट बघत आहात. राज्याला मागास आयोग लागतो याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही. मागास आयोगाची स्थापना करा. मेडिकल फिल्डच्या सिटा तुम्ही विकत घ्या आणि मराठा समाजाला त्यामध्ये प्रवेश द्या अशीही मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -