घरताज्या घडामोडीRBIने दिली २ हजार रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाची माहिती

RBIने दिली २ हजार रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाची माहिती

Subscribe

आधीपासून ज्या नोटा प्रचलित असलेल्या नोटा बाजारात सुरु राहतील

सध्या चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महत्त्वाची माहिती दिली आहे. २६ मे पासून रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटांचा नवीन पुरवठा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. २०१६मध्ये नोटबंदीच्या दरम्यान २ हजार रुपयांची नोट लाँच करण्यात आली आहे. या नोटा आता हळूहळू चलनातून बाद होत आहेत. याआधीही RBIने २ हजार रुपयांच्या नोटा नव्याने येणार नसल्याचे सांगतले होते. आता आधीपासून ज्या नोटा प्रचलित आहेत त्या नोटा बाजारात सुरु राहतील. RBIने त्यांच्या वार्षिक अहवालात असे म्हटले होते की, मागील वर्षात म्हणजे २०२०-२१ या आर्थिक वर्षात २ हजर रुपयांच्या नवीन नोट झापण्यात आलेल्या नाहीत. २०१८ -१९ मध्ये RBIने ४६७ लाखांच्या २ हजारांच्या नोटांचा पुरवठा केला होता. २ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांचा वाटा ८७.५ टक्के असल्याचे RBI ने म्हटले होते. (Reserve Bank of India has clarified there will be no new supply of Rs 2,000 notes)

सरकारी आकडेवारीनुसार, ३० मार्च २०१८ पर्यंत ३अब्ज ३६ कोटी २० लाख नोटा सर्क्युलेशनमध्ये होत्या. २०१९-२० आणि २०२०-२१ दरम्यान २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईच्या संबंधित कोणताही सरकारी आदेश जारी करण्यात आला नाही. याचाच अर्थ २०१९-२० पासून २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई सरकारने थांबवली आहे.

- Advertisement -

बिझिनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बँकेच्या ATM मधील नोटांच्या कॅसेटमधून २ हजार रुपयांच्या नोटांच्या कॅसेट काढून टाकण्यात आल्या आहेत. होर्डिंग थांबवता येतील आणि काळ्या पैशाला आळा बसेल म्हणून सरकारने २ हजार रुपयांच्या नवीन नोटा न छापण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींची नौटंकीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं कारण, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -