घरठाणेभातसा-उजवा कालवा पाईपलाईनने बंदिस्त करा; शिवसेनेची मागणी

भातसा-उजवा कालवा पाईपलाईनने बंदिस्त करा; शिवसेनेची मागणी

Subscribe

तब्बल ४० वर्षे होऊन गेलेल्या भातसा-उजवा कालव्याला उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी पोखरून ठेवल्याने या कालव्यामुळे सिंचनापेक्षा पाण्याचा अपव्यय अधिक होत आहे.

तब्बल ४० वर्षे होऊन गेलेल्या भातसा-उजवा कालव्याला उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी पोखरून ठेवल्याने या कालव्यामुळे सिंचनापेक्षा पाण्याचा अपव्यय अधिक होत आहे. वारंवार कालव्याला भगदाड पडून जमिनीचे व पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरणारा उजवा कालवा पाईपलाईनने बंदिस्त करण्याची मागणी शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे या पाईपलाईनमधून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याबाबतही लक्ष वेधण्यात आले आहे. या बहुउद्देशीय धोरणामुळे पाण्याची बचत होऊन सिंचन व पाणी पुरवठ्याचे ध्येय साध्य होणार आहे.

 

- Advertisement -

सिंचनासाठी निर्मिती करण्यात आलेल्या भातसा धरणातून सिंचनासह मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंचनासाठी भातसा धरणावरून उजवा कालव्याची निर्मिती करण्यात आली असून तब्बल ५४ किमी लांबीच्या या उजव्या कालव्यातून शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील हजारो शेतकरी भातशेती व भाजीपाल्याची पिके घेतात. सुमारे ४० वर्षे होऊन गेलेल्या या उजव्या कालव्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खेकडे, उंदीर, घुशींनी पोखरल्यामुळे संपूर्ण कालव्याची वाताहत झाली आहे. नादुरुस्त झालेल्या या काळव्यामुळे ५० टक्के पाणी पाझरून जाते. त्यामुळे ५४ किमीपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी दुबार शेतीपासून वंचित राहिले आहेत. बंदिस्त काळव्यामुळे अतिरिक्त पाणी जाऊन जमिनीची होणारी धूप थांबविण्यास मदत होणार आहे. ऑक्टोबरमध्ये पावसाळी पीक घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यात कालव्याचे पाणी सोडले जाते व मे महिन्यात पाणी बंद करण्यात येते. त्यामुळे वर्षभर जमीन होत नसल्याने जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. भविष्यातील पाण्याचे महत्व लक्षात घेता कालव्यातून पाण्याचा प्रचंड अपव्यय होत असल्याबाबत शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शासनाचे लक्ष यापूर्वीच वेधले होते.

 

- Advertisement -

त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने या कालव्याबाबत ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. भातसा उजवा कालवा पाईपलाईनने बंदिस्त केल्यास पाण्याचा अपव्यय न होता शेतीसाठी आवश्यकतेनुसार तसेच प्रमाणात पाण्याचा वापर होऊन नादुरुस्त झालेल्या कालव्याला वारंवार भगदाड पडून शेतजमिनीचे व पिकांचे नुकसानही होणार नाही. तसेच बंदिस्त पाईपलाईनला टॅपिंग केल्यास कालवा परिसरातील सरलांबे, अर्जुनली, आवरे, चेरपोली, गोठेघर, शहापूर, वाफे, सावरोली, माहुली, आसनगाव, खातीवली, दहागाव, सारमाळ, कासणे, वडवली आदी कालवा परिसरातील गावांसाठी पाणीपुरवठा योजना करून तेथील पाणीटंचाई देखील दूर होण्यास मदत होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या या बहुउद्देशीय धोरणामुळे जमिनीची धूप थांबून जमीन नापीक होण्यापासून वाचणार आहे. पाण्याचा सिंचनासाठी योग्य वापर होऊन पाण्याचा अपव्यय टळणार आहे. पिकांची उत्पादन क्षमता वाढणार आहे. पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी वरदान ठरून या भागाचा भरीव विकास होणार असल्याने उजवा कालव्यास पाईपलाईनने बंदिस्त करण्यात यावा, अशी मागणी बरोरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 

हेही वाचा –

कसार्‍याजवळ धावत्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बाळाचा जन्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -