घरताज्या घडामोडीपेट्रोल, डिझेलवर मागील ७० वर्षात झालेला अन्याय मोदींनी दूर केला, काँग्रेसची खोचक...

पेट्रोल, डिझेलवर मागील ७० वर्षात झालेला अन्याय मोदींनी दूर केला, काँग्रेसची खोचक टीका

Subscribe

केंद्र सरकारला ७ वर्षे झाले असल्याची भेट म्हणून पेट्रोल डिझेल शंभरी पार केली

केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन ७ वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. ३० मे २०२१ रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्षे पुर्ण झाली. मात्र ७ वर्षांमध्ये मोदी सरकारने ७० वर्षांत जे कमावलं होते ते गमावल्याची टीक काँग्रेसकडून करण्यात आली होती. काँग्रेसने राज्यभर आंदोलन करुन मोदी सरकारच्या कामकाजाचा निषेध केला होता. मोदी सरकारची ७ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल जनतेला भेट मिळाली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तसेच ७० वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवर जो अन्याय झाला होता तो मोदींनी दूर केलाय अशी खोचक टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला लगावली आहे.

काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत पेट्रोल डिझेल दरावाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी असताना देशांतर्गत मात्र पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यावर केंद्र सरकारला ७ वर्षे झाले असल्याची भेट म्हणून पेट्रोल डिझेल शंभरी पार केली असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल डिझेलवर अन्याय झाला होता तो आता मोदींनी दूर केला आहे. यावर सचिन सावंत यांनी टाळ्या वाजवल्याचे चित्र वापरले आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मोदी सरकारची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनतेला भेट – महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यात पेट्रोल ने शंभरी पार केली. ७० वर्षात पेट्रोल डिझेल वर प्रचंड अन्याय झाला होता. मोदींनी पेट्रोल डिझेलवरचा अन्याय दूर केला आहे. मोदी सरकार जनतेला संकट काळात मदत करण्याऐवजी सूड उगावत आहे. काँग्रेस ने २०१४ ला सत्ता सोडली त्यावेळी क्रूड ऑइल १०८ डॉलर होते. व पेट्रोल जवळपास ₹ ७० होते. आज क्रूड ऑइल जवळपास ६७ डॉलर आहे पण पेट्रोल १०० पार गेले आहे. गेले ७ वर्षे पेट्रोल डिझेल वर एक्साईज ड्युटी लावून २० ते २५ लाख कोटी काढले. गेले कुठे? मोदी सरकारचे कर्तृत्व यातून दिसते. अशा आशयाचे ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

- Advertisement -

राज्यात अनेक जिल्ह्यांत पेट्रोलचा दर शंभरी पार गेला आहे. सामान्य नागरिक वाढत्या इंधनाच्या दरामुळे भरडला गेला आहे. मोदी सरकारच्या पेट्रोल दरवाढीवरुन अनेक नागरिकांनी सोशलमीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे. तर केंद्र सरकारच्या ७ वर्षांच्या कालावधीविरोधात काँग्रेस नेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला होता. मुंबई ठाण्यात पेट्रोल दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेट्रोलची शंभरी पार केल्यामुळे बॅनरबाजी करण्यात आली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -