घरCORONA UPDATEअत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ पर्यंत खुली राहणार, मुंबई महापालिकेचा निर्णय

अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ पर्यंत खुली राहणार, मुंबई महापालिकेचा निर्णय

Subscribe

जीवनावश्यक आणि इतर दुकानांच्या वेळांसाठी नवीन नियम

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अतर्गंत (Break the Chain) राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. १ जून ते १५ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यातील लॉकडाऊन एकदम न उठवता टप्प्या टप्प्याने उठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यापद्धतीने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील जीवनावश्यक आणि इतर दुकानांच्या वेळांसाठी मुंबई पालिकेकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. (Essential service shops will open till 2 pm, decision of Mumbai BMC)

दुकानांच्या वेळांसाठी नवीन नियम

  • जीवनावश्यक व इतर दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजे दरम्यान उघडे ठेवण्याची परवानगी.
  • शनिवार रविवारी फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी ठेवता येणार
  • पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरु राहतील. रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकाने मंगळवार,गुरूवारी सुरु राहतील.
  • त्या पुढील आठवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरु राहतील. रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने मंगळवार,गुरूवारी सुरु राहतील.
  • शनिवार आणि रविवारी आवश्यकतेतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
  • ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी असेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले ब्रेक द चेन बाबतचे आदेश अस्तीत्वात असेपर्यंत लागू असतील. त्याचप्रमाणे शासनाने जारी केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग,मास्क लावणे या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.  राज्यात १५ जून पर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टींना शिथिलता देण्यात येणार आहे.

- Advertisement -

उक्त आदेशान्वये सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबावणी करण्यास विरोध केल्यास संबंधितांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,२००५ मधील कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता, १८६० मधील कमल १८८ आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत.


हेही वाचा – महाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढला, निर्बंध वाढवणे हा नाईलाज – मुख्यमंत्री

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -