घरताज्या घडामोडीCBSE-ICSE Board Exam: बारावी परीक्षांचे निर्णय देण्याआधीच केंद्रीय शिक्षण मंत्री AIIMS रुग्णालयात...

CBSE-ICSE Board Exam: बारावी परीक्षांचे निर्णय देण्याआधीच केंद्रीय शिक्षण मंत्री AIIMS रुग्णालयात दाखल

Subscribe

याआधीही शिक्षण मंत्र्यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून बारावी बोर्डाच्या परीक्षांवरुन चर्चा सुरु आहे. अनेक महिने रखडलेल्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निर्णय घेणार होते. CBSE,ICSE आणि इतर बोर्डाच्या बारावी परीक्षांचे महत्त्वाचे निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री घेणार होते. मात्र त्याआधीच शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना आज,मंगळवारी दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (CBSE-ICSE Board Exam: Union Education Minister Ramesh Pokhriyal admitted to AIIMS Hospital before deciding on 12th exam)  पोस्ट कोरोनानंतर होणाऱ्या समस्यांमुळे त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना त्वरित AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधीही शिक्षण मंत्र्यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता त्यांना पोस्ट कोविडच्या लक्षणांमुळे AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षण मंत्रीच रुग्णालयात असतील तर आज बारावीच्या परीक्षांच्या संदर्भातील निर्णयाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. केंद्र सरकारने ३१ मे रोजी सुप्रीम कोर्टाकडे परीक्षांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन दिवस मागितले होते. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना ३ जून पर्यंत त्यांच्या अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाला द्यावा लागणार आहे. मात्र त्याआधीच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची तब्येत बिघडल्याने बारावी परीक्षांचे निर्णय घेण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयाकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

३१ मे रोजी बारावी परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. बारावी परीक्षाबाबत काय निर्णय घेण्यात येईल याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष होते. परंतु आता शिक्षण मंत्र्यांची तब्येत बिघडल्याने परीक्षांचे निर्णय कळणे कठीण झाले आहे. ३ जून पर्यंत शिक्षण मंत्रालय आपला निर्णय सुप्रीम कोर्टाला दिल्यानंतर काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अटॉर्नी जनरलच्या वेणुगोपाल यांनी न्यायाधिश ए.एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या विशेष पीठाला सांगितले होते की, आम्हाला गुरुवार पर्यंतचा वेळ द्या. दोन दिवसात सरकार बारावी परीक्षासंदर्भात अंतिम निर्णय घेईल. सर्व राज्यांच्या सूचनांचा विचार करुन केंद्रीय शिक्षण मंत्रालय ३ जून रोजी रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर करेल.


हेही वाचा – CBSE Board 12th Exam : १२ वी परीक्षा २४ जुलैपासून होणार सुरु, शिक्षण मंत्रालयाने तयार केल्यात ३ योजना

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -