घरनवी मुंबईनवी मुंबईत १२ निवासी, वाणिज्यिक भूखंड विक्री; सिडकोचा बांधकाम क्षेत्राला दिलासा

नवी मुंबईत १२ निवासी, वाणिज्यिक भूखंड विक्री; सिडकोचा बांधकाम क्षेत्राला दिलासा

Subscribe

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल नोडमधील एकूण १२ मोठ्या क्षेत्रफळांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात आली असून भूखंड हे निवासी तथा वाणिज्यिक वापराकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल नोडमधील एकूण १२ मोठ्या क्षेत्रफळांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात आली असून भूखंड हे निवासी तथा वाणिज्यिक वापराकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिडकोतर्फे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या, लहान व मध्यम आकाराच्या निवासी भूखंडांच्या विक्रीच्या योजनेस उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर सिडकोकडून १२ मोठ्या क्षेत्रफळाचे निवासी तसेच वाणिज्यिक भूखंड विक्रीकरता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिडकोकडून कोविड महासाथ व टाळेबंदीमुळे मंदीग्रस्त झालेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून ही योजना हे त्या संदर्भातील एक नवे पाऊल आहे.

सिडकोकडून सातत्याने नवी मुंबईतील निवासी, वाणिज्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उद्देशाकरिता असलेले विविध भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शहराचा परिपूर्ण विकास साधण्याचे, महामंडळाचे उद्दिष्ट साध्य होते. या योजने अंतर्गत सिडकोकडून खारघर, कळंबोली व नवीन पनवेल नोडमधील एकूण १२ निवासी तथा वाणिज्यिक वापराचे भूखंड उपलब्ध करून देण्यात आले असून १९०२.४३ चौ. मी. ते ८१४३.३०8 चौ. मी. दरम्यानच्या क्षेत्रफळाचे हे भूखंड आहेत. भूखंड हे किफायतशीर दरात उपलब्ध असून निर्वेध मालकी (क्लिअर टायटल) असणाऱ्या या भूखंडांना सिडकोची हमी आहे.

- Advertisement -

कोविड-१९ महासाथ व टाळेबंदीमुळे काहीशी मंदी आलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्याकरिता ही योजना निश्चितच उपयोगी ठरणार आहे. मोठ्या आकाराच्या भूखंडांवर विकसित करण्यात येणारी भव्य निवासी व वाणिज्यिक बांधकामे ही शहराच्या विकासात भर घालणारी ठरणार आहेत.
– डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको

ही योजना ई-निविदा व ई-लिलाव पद्धीतीने पार पडणार असून भूखंडांच्या तपशिलासह वेळापत्रक नमूद असलेली योजना पुस्तिका १५ जून २०२१ पासून सिडकोच्या https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदारांच्या ऑनलाइन नोंदणीस १५ जून पासून सुरुवात होणार आहे. ई-निविदा प्रक्रिया ६ जुलै २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. तर ८ जुलै २०२१ रोजी ई-लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

- Advertisement -

या योजनेमुळे अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत, सामाजिक व वाणिज्यिक सुविधा असणाऱ्या नवी मुंबईमध्ये आपले मनपसंत घर साकारण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. उपनगरी रेल्वे, महामार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे, यांमुळे नवी मुंबईला उत्तम संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नजीकच्या काळात साकार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबई थेट जगाला जोडली जाणार आहे. तसेच सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम होणार आहे. नियोजित कॉर्पोरेट पार्क प्रकल्पामुळे शहराच्या वाणिज्यिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होणार आहेत.

हेही वाचा –

मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त न करता आग्रह धरला पाहिजे, नाना पटोलेंना रामदास आठवलेंनी दिला सल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -