घरफिचर्सझोप घ्या आणि सौंदर्य वाढवा

झोप घ्या आणि सौंदर्य वाढवा

Subscribe

चांगली झोप घेतल्याणे सौंदर्य वाढते असे स्वीडिश संशोधनातून समोर आले आहे. याचा अर्थ वेळ मिळेल तेव्हा किंवा सतत झोपू नका. पण शरीराला आराम मिळेल आणि संपूर्ण थकवा निघून जाईल एवढावेळ तरी नक्कीच झोप घ्या.

तुम्हाला तुमच्या त्वचेचे (चेहर्‍याचे) सौंदर्य वाढवायचे आहे, तर मग आजपासून रोज चांगली झोप घ्या. कारण चांगली झोप घेतल्याणे सौंदर्य वाढते असे स्वीडिश संशोधनातून समोर आले आहे. याचा अर्थ वेळ मिळेल तेव्हा किंवा सतत झोपू नका. पण शरीराला आराम मिळेल आणि संपूर्ण थकवा निघून जाईल एवढावेळ तरी नक्कीच झोप घ्या.

कमी झोप बिघडवते सौंदर्य

स्वीडनमधील स्टॉक होम या विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी लोकांच्या झोपण्याच्या पद्धतीवर केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते केवळ दोन रात्रीची खराब झोप कुणाच्याही चेहर्‍याचे सौंदर्य बिघडवण्यास पुरेशी आहे. कमी झोप घेतल्याने डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे बनतात.

- Advertisement -

डोळ्यांना सुज येते. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे लोक त्यांच्यांशी मिळून मिसळून राहण्यास कचरतात. शास्त्रज्ञांनी संशोधनात विद्यापीठाच्या २५ विद्यार्थ्यांना निवडण्यात आले. त्यांना एक किट देण्यात आले होते. ज्यामुळे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात यावे.

प्रयोग

विद्यार्थ्यांनी रात्री चांगली झोप घेतल्यानंतर आठवडाभरात त्यांना ४ तास झोप घेण्यास सांगितले. या प्रयोगात दोन्ही वेळेस दिद्यार्थ्यांची छायाचित्रे घेण्यात आली. शास्त्रझांनी स्टडीहोममध्ये १२२ अनोळखी लोकांना हे फोटो दाखवून त्यांची मते जाणून घेतली. आक्रषक दिसणे, आरोग्य, झोप आणि विश्वास करण्यासारख्या मुद्द्यांवर त्यांना गुणांक देण्यास सांगण्यात आले. तसेच त्यांना हेही विचारण्यात आले की ,या विद्यार्थ्यांना भेटण्यास तुम्ही इच्छुक आहात काय? थकलेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यास किंवा त्यांच्यात मिसळण्यास लोकांचे मत नकारात्मक होते. परंतु, चांगली झोप घेणार्‍या मुलांच्या बाबत सर्वच जण आकर्षित झाले. तसेच त्यांना सुंदर असेच संबोधले.

- Advertisement -

या संशोधनाचे प्रमुख संशोधक संडेलिन यांचे म्हणणे आहे की, जे लोक जास्त आकर्षक दिसतात ते जास्त सामाजिक असतात. कमी झोपल्याने शरिरात थकवा निर्माण होतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या सौंदर्यावर दिसून येतो. त्यामुळे हे संशोधन आपल्याला जाणीव करून देतेय की, पुरेशी झोप आपल्यासाठी किती आवश्यक आहे ते. त्यामुळे आता सौंदर्य वाढवायचे असेल तर पार्लरमध्ये जाणे, इतर सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक्स वापरण्या सोबतच पुरेशी झोपही घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -