घरताज्या घडामोडीतुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता का? मग हे वाचा

तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता का? मग हे वाचा

Subscribe

आपल्यापैकी अनेकांची दिवसाची सुरुवात ही चहा पिऊनच होते. सकाळी चहा घेतल्याने फ्रॅश वाटते. पण हाच सकाळचा रिकाम्यापोटी घेतलेला चहा अनेक आजारांनाही आमंत्रण करतो. p

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्यापोटी चहा घेतल्यानंतर तोंडातील बॅक्टीरिया थेट आतड्यांमध्ये जातात. शरीरातील चांगल्या बॅक्टिरियाबरोबर  मिळून ते आपली पचनशक्ती बिघडवतात. यामुळे पोट खराब होते.

- Advertisement -

तसेच रिकाम्यापोटी चहा पिल्याने शरीरातील अॅसिड व क्षार यांचे संतुलन बिघडते.

चहामध्ये थियोफिलाइन नावाचे एक रसायन असते. ज्यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास होतो.

- Advertisement -

दूधाचा चहा पिल्याने काही जणांना पोट फुगल्यासारखेही वाटते.

चहामध्ये निकोटीन असते. त्यामुळे काहीजणांना फ्रेश वाटतं. त्यातूनच मग सकाळचा चहा ही सवय न राहता व्यसन होतं.

हे सर्व टाळण्यासाठी काय कराल ?

सकाळी ब्रश झाल्यानंतर  जीऱ्याचे पाणी, बडीशोपचे पाणी, मेथीचे पाणी, लिंबू पाणी, आवळ्याचा रस अशी पेय प्यावीत.

सकाळी उठल्यावर साधे पाणी प्यावे. त्यानंतर पाच दहा मिनिटांनी फळ खावे.

त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी चहा किंवा कॉफी घ्यावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -