घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालक ठार

नाशिक-पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालक ठार

Subscribe

कंटेनरचालकावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीचालक ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर चिंचोली फाटा येथे सोमवारी (दि.१४) रात्री घडली. याप्रकरणी कंटेनरचालकावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक सोनवणे (वय ३२, रा. गुलमोहर कॉलनी, कामटवाडे शिवार) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे हे दुचाकीवरून सिन्नरकडून नाशिककडे येत होते. त्यावेळी पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात त्याचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -