घरताज्या घडामोडीभाजपला झटका ! हिंगणघाटमधील १० नगरसेवक शिवसेनेत, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी हाती बांधले...

भाजपला झटका ! हिंगणघाटमधील १० नगरसेवक शिवसेनेत, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी हाती बांधले शिवबंधन

Subscribe

वर्ध्यातील हिंगणघाटमधील १० नरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी भाजपवरील नाराजीमुळं शिवसेनेत प्रवेश

शिवसेना वर्ध्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या आजी-माजी १२ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेने मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का दिल्यानंतर आता वर्ध्यातील नगरसेवकांना शिवसेनेत सामील केलं आहे. हिंगनघाटमधील १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोदी-ठाकरे यांच्या भेटीनंतर हा शिवसेनेचा पहिलाच धक्का आहे. हिंगणघाटच्या नगरपरिषदेत सध्या भाजपची सत्ता आहे परंतु आगामी नगरपालिका निवडणुकींमध्या भाजपची सत्ता उलथवण्याच्या दिशेनं शिवसेनेची वाटचाल सुरु आहे.

वर्ध्यातील हिंगणघाटमधील १० नरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी भाजपवरील नाराजीमुळं शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन हा नगरसेवकांच्या हाती बांधले आहे. हिंगणघाट नगरपरिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह १० नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं आहे. भाजपचा गड असलेल्या हिंगनघाटमध्ये चांगलाच झटका बसला आहे. चंद्रकांत घुसे-उपाध्यक्ष नगरपालिका, सतिश ढोबे, सुरेश मुंजेवार, भास्कर थावरी, मनोज वाघमारे, नीता ढोबे,निलेश पोगळे,सुनिता पचोरी,संगिता वाघमारे, मनीष देवढे, बंटी वाघमारे या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

नगरसेवकांचा स्वतःहून प्रवेश

हिंगणघाटमधील अनेक मंडळी ही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. ते स्वतः विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता स्वतः त्यांनी प्रवेश केला आहे. भविष्यात वर्धा जिल्ह्यात शिवसेना भक्कम आणि बळकट कशी करावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सर्व नगरसेवक त्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि शिवसेना बळकट करतील. हिंगनघाट नगरपालिकेत तातडीने बदल नाही होणार आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेनुसार निश्चितपणे बदल घडवून आणू तसेच ऑक्टोबरमध्ये निवडणूका होणार आहेत त्या निवडणुकीत आता शिवसेनेची सत्ता आणण्याचा निश्चय केला आहे.

जळगामध्ये भाजपला धक्का

मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी या १० नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये ७ विद्यमान नगरसेवक आहेत तर ३ माजी नगरसेवक आहेत. यामुळे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. यापुर्वी महापौर शिवसेनेचा झाल्यामुळे भाजपला धक्का बसला होता तर आता १० नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपलाच हादरा बसला आहे. यापुर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -