घरमहाराष्ट्रनाशिकमागण्या मान्य होईपर्यंत ’आशां’चा संप कायम

मागण्या मान्य होईपर्यंत ’आशां’चा संप कायम

Subscribe

सीटूच्या वतीने या आंदोलनाचे नेतृत्व

कोरोना संकटकाळात आरोग्य सर्वेक्षण ते रुग्णांची सेवा करण्याचे काम आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून केले. मात्र अद्यापही आशा सेविकांना मानधन देण्यात आले नाही. अत्यल्प मजुरीवर त्यांना राबवून घेतले जात आहे. त्यामुळे याविरोधात राज्यभरातील अशा सेविकांनी एकत्र येऊन जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सीटूच्या वतीने या आंदोलनाचे नेतृत्व केले जाते आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आशा गटप्रवर्तक बेमुदत संपावर असतील. आंदोलकांच्या वतीने शासनाला निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी सीटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, इंदुबाई गावित, संगीता भोये, मंगल शिंदे, पुष्पा भोये, परबा महाले आदींसह आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

- Advertisement -

या आहेत मागण्या

  • आशा व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारने घ्यावी
  • आशा व कुटुंबीयांना विमा कवच आरोग्य संरक्षण द्यावे
  • आजारी पडल्यामुळे कामावर आले नाही तर मानधन कापले जावू नये
  • आशांना कोरोना काळात केलेल्या कामाचे किमान २१ हजार रुपये मासिक वेतन मिळावे
  • पगार वाढ व्हावी आणि नोकरीत कायम स्वरूपी म्हणून सामावून घ्यावे

यासह विविध मागण्यासाठी आशा सेविकांनी संप पुकारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -