घरमहाराष्ट्रजी अवस्था भुजबळांची झाली तीच अवस्था देशमुख, परब यांची होणार - किरीट...

जी अवस्था भुजबळांची झाली तीच अवस्था देशमुख, परब यांची होणार – किरीट सोमय्या

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने आज छापे टाकले. ईडीच्या कारवाईवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचक इशारा दिला. अनिल देशमुख यांच्या घरावर आज धाड पडली आहे. परंतु काही दिवसांनी अनिल देशमुख जेलमध्ये असतील, असं म्हणत जी अवस्था छगन भुजबळ यांची झाली तीच अवस्था देशमुख आणि अनिल परब यांची होईल, असं सोमय्या म्हणाले.

अनिल देशमुख यांच्या घरावर आज धाड पडतेय. पण काही दिवसांनी अनिल देशमुख यांची रवानगी जेलमध्ये होणार हे मी खात्रीपूर्वक सांगतो, असं सोमय्या म्हणाले. अनिल देशमुख यांनी वाझे गँगचा पैसा आणि आणखी घोटाळ्याचा पैसा कोलकात्यामधील बोगस कंपन्यांमध्ये वळवला होता. त्या कंपन्या परिवाराने घेतल्या होत्या हे सिद्ध झालेलं आहे, असं देखील सोमय्या म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी अनिल परब यांची देखील हिच अवस्था होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं. “आणखी एक गोष्ट सांगतो, वाझे वसूली गँगमधले अनिल देशमुख यांचे पार्टनर अनिल परब यांची पण हिच अवस्था होणार आहे. छगन भुजबळ यांनी पण असंच घोटाळ्याचा पैसा स्वत:च्या कंपन्यांमध्ये वळवला होता. तीन वर्ष जेलमध्ये होते. आता हिच अवस्था यांची पण होणार,” असं किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

- Advertisement -

देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर ईडीचा छापा

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे.


हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीचा छापा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -