घरताज्या घडामोडीCBI चौकशीची मागणीने संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली?, चित्रा वाघ यांचा...

CBI चौकशीची मागणीने संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली?, चित्रा वाघ यांचा सवाल

Subscribe

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत तर सोडा शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे सुद्धा राज्य सरकारने दिले नाही

सचिन वाझेच्या पत्रावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे. शिवसेना खासदार यांनी चौकशीच्या मागणीवरुन प्रतिक्रिया देताना सीबीआय आणि ईडी तुमच्या पक्षाचे सदस्य आहेत का? असा सवाल केला होता. यावर आता भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. सीबीआय चौकशीची मागणी करताच संजय राऊत यांच्या छातीत धडकी का भरली? असा सवाल करत संजय राऊतांनी नैतिकतेचे धडे शिकवू नये असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये. सत्तेचा गैरवापर करत एका महिलेला त्रास दिला गेला. ती महिला न्याय मागण्यासाठी न्यायालयात गेली तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आणि आशा निरंकुश शोषक वृत्तीच्या लोकांना प्रभू श्रीरामचंद्रांचे महत्त्वही कळणार नाही आणि राम जन्मभूमीचे महत्त्वही कळणार नाही.

- Advertisement -

कालच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काही लोकांची सीबीआय चौकशी करा म्हणून मागणी करण्यात आली. मला हेच करत नाही संजय राऊत यांच्या छातीत धडकी का भरली? वाझे तिकडे जेलमध्ये बसून त्याच्या पापाच्या भागीदारांची नावे घेतो आहे. कारवाई तर होणारच, भाजपच्या बैठकीमध्ये संजय राऊत ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, बारा बलुतेदार आणि कष्टकऱ्यांना एक रुपयाची मदत नाही केली आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत तर सोडा शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे सुद्धा राज्य सरकारने दिले नाही आहेत. संजय राऊत यांना आव्हान आहे की, त्यांनी या प्रश्नांवर महाविकास आघाडीला जाब विचारला पाहिजे आणि त्यांच्या शौर्याचा परिचय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला करुन दिला पाहिजे, बाकी जनता सगळ जानतेच आहे असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.

तपास यंत्रणांची बदनामी होतेय

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सीबीआयचा ठराव झाला त्याचं आश्चर्य आहे. सीबीआय इडी काय यांच्या पार्टीचे आहेत. या यंत्रणांचं अवमुल्यन होतंय. न्यायलय आहे, हे कुठेतरी थांबायला हवं. हे सगळे सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? इडी आणि सीबीआयची बदनामी होतेय. तसंच यंत्रणांचा वापर करून कुणाला वाटत असेल की सत्ता मिळेल तर ते अंधारात चाचपडत आहे. पुढील ३ वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -