घरदेश-विदेशPan Card ला Aadhaar Card लिंक करण्याची मुदत केंद्राने पुन्हा वाढवली, 'ही'...

Pan Card ला Aadhaar Card लिंक करण्याची मुदत केंद्राने पुन्हा वाढवली, ‘ही’ आहे शेवटची तारीख

Subscribe

Pan Card आणि Aadhaar Card लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने आज पुन्हा वाढवली आहे. ही मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढवली आहे अशी घोषणा अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. त्यामुळे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत नागगिक आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करु शकणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान केंद्राने ३० जूनपर्यंत नागरिकांना आधार कार्ड-पॅन कार्डला लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. परंतु ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्राने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय आयकर परचाव्याबाबत (Tax Reture) देखील केंद्र सरकारने काही घोषणा केल्या आहेत. केंद्राने विवाद से विश्वास या योजनेअंतर्गत थकीत आयकरावरील व्याज माफ करण्याची मुदतही वाढवली आहे. ३० जूनपर्यंत असणारी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंद्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाल्याने रोजचा आर्थिक गाडा कसा चालवायचा असा प्रश्न अनेक नागरिकांसमोर निर्माण झाला. या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना आयकर भरण्यासाठी अधिक वेळ मिळावा. या हेतूने थकीत आयकरावर व्याज लावण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्य़ाचबरोबर टीडीएस स्टेटमेंट जमा करण्याची ३० जूनपर्यंत असलेली मुदत १५ दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत टीडीएस स्टेटमेंट जमा करता येणार आहे. तर टॅक्स डिडक्शन सर्टिफिकेटसाठीची मुदतही ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. रजिस्ट्रेशन ऑफ इन्स्टिट्यूशन्सची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर सेटलमेंट कमिशनकडे दाखल केलेलं प्रकरण मागे घेण्यासाठीची मुदतही ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


कोरोनाबाधितांना मोठा दिलासा, उपचार खर्च होणार आता ‘टॅक्स फ्री’


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -